शौचालय बांधकामाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:23 PM2018-04-05T14:23:23+5:302018-04-05T14:23:23+5:30

वाशिम :  स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा हा अमरावती विभागात अव्वल ठरला असून, अकोला जिल्हाची शेकडा टक्केवारी सर्वात कमी आहे.

Washim district tops upload 'Toilet' photo | शौचालय बांधकामाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा अव्वल !

शौचालय बांधकामाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा अव्वल !

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात ९४.५५ टक्के छायाचित्र अपलोड करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात ६६ हजार ७७६ छायाचित्र अपलोड झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात एक लाख ३२ हजार २६१ छायाचित्र अपलोड झाले आहेत.

वाशिम :  स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा हा अमरावती विभागात अव्वल ठरला असून, अकोला जिल्हाची शेकडा टक्केवारी सर्वात कमी आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पात्र लाभार्र्थींना शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनातर्फे अनुदानदेखील देण्यात येते. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करणे बंधनकारक आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत जास्तीत-जास्त छायाचित्र अपलोड करण्याचे निर्देश शासनस्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले होते. छायाचित्र अपलोड करण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात ९४.५५ टक्के छायाचित्र अपलोड करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. यापैकी एक लाख ३२ हजार ३०९ छायाचित्र अपलोड झाले.

अकोला जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार २६५ शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. यापैकी ६६ हजार ७७६ छायाचित्र अपलोड झाले असून, याची टक्केवारी ५६.४६ अशी येते. अमरावती जिल्ह्यात एकूण १ लाख ५८ हजार ९४ शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. यापैकी एक लाख ३२ हजार २६१ छायाचित्र अपलोड झाले असून, याची टक्केवारी ८५.१० अशी येते. 

यवतमाळ जिल्ह्यात एकूण २ लाख ६८ हजार ८३३ शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. यापैकी एक लाख ३६ हजार ३८ छायाचित्र अपलोड झाले असून, याची टक्केवारी ५८.३४ अशी येते. बुलडाणा जिल्ह्यात एकूण १ लाख ९४ हजार ९०० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. यापैकी एक लाख ५४ हजार ६३९ छायाचित्र अपलोड झाले असून, याची टक्केवारी ८२.०१ अशी येते. 

 

दिरंगाई करणाऱ्यांची सुनावणी
वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्यासंदर्भात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक काम करू न शकणाºया ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांची सुनावणी जिल्हा स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात घेण्यात येणार आहे.

Web Title: Washim district tops upload 'Toilet' photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.