२६१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:03 AM2017-10-07T02:03:19+5:302017-10-07T02:03:44+5:30

वाशिम: जिल्हय़ातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची यंदा  निवडणूक होणार होती; मात्र १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने  आता ७ ऑक्टोबरला उर्वरित २६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक  होत असून, त्यासाठी ७९७ मतदान केंद्रे ेकार्यान्वित करण्यात  आली आहेत. या निवडणुकीत ३ लाख ३२ हजार १८५ मतदार  मतदानाचा हक्क बजावणार असून, ३0,६६ सदस्य आणि ९१२  सरपंच पदाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. 

Today voting for 261 Gram Panchayats! | २६१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान!

२६१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान!

Next
ठळक मुद्दे७९७ मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ रवाना३ लाख ३२ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हय़ातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची यंदा  निवडणूक होणार होती; मात्र १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने  आता ७ ऑक्टोबरला उर्वरित २६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक  होत असून, त्यासाठी ७९७ मतदान केंद्रे ेकार्यान्वित करण्यात  आली आहेत. या निवडणुकीत ३ लाख ३२ हजार १८५ मतदार  मतदानाचा हक्क बजावणार असून, ३0,६६ सदस्य आणि ९१२  सरपंच पदाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. 
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांंचा कार्यकाळ संपत असल्याने  जिल्हय़ातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात वाशिम तालु क्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव  तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्या तील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा  समावेश होता; मात्र गावकर्‍यांनी एकोप्याचा संदेश देत आपसी  सहमतीने १२ ग्रामपंचायती अविरोध केल्या. त्यामुळे आता ७  ऑक्टोबरला प्रत्यक्ष २६१ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक होत  आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, म तदान केंद्रस्तरीय अधिकारी व विशेष पथकातील चमू  ईव्हीएमसह आपापल्या केंद्रांवर रवाना झाल्याची माहिती निवासी  उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
चोख पोलीस बंदोबस्त तैनात
२६१ ग्रामपंचायतींमध्ये होत असलेल्या निवडणुकीदरम्यान  कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनही  सज्ज झाले असून, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा  येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविण्यात आली आहे.  त्यानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस  अधीक्षक, ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २७ पोलीस  निरीक्षक, ४५ पोलीस उपनिरीक्षक, १६ सहायक पोलीस  निरीक्षकांसह १,७00 पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी, ६00  होमगार्ड्स असा मुबलक प्रमाणातील पोलीस ताफा म तदानादरम्यान करडी नजर ठेवून राहणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली. 

जिल्हय़ातील २६१ ग्रामपंचायतींमध्ये ७ ऑक्टोबरला होऊ घा तलेल्या निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली असून,  केंद्रस्तरीय कर्मचारी व विशेष पथकास यासंबंधीचे प्रशिक्षण  देण्यात आले आहे. मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  लागू करण्यात आले असून, नियमबाहय़ वर्तन करणार्‍यांची  कुठलीच गय केली जाणार नाही. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने  घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा आणि योग्य  उमेदवाराची निवड करावी.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Today voting for 261 Gram Panchayats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.