क्षयरोग शोध मोहिम : आरोग्य विभागातर्फे १.६७ लाख नागरिकांना गृहभेटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:08 PM2018-07-01T15:08:35+5:302018-07-01T15:11:33+5:30

वाशिम: क्षयरोग निदानापासून वंचित असणाºया क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्ह्यात १८ जून ते ३० जून या  दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. १.६७  लाख नागरिकांना गृहभेटी देऊन जनजागृती केली.

TB diagnostic campaign: Health department visits 1.67 lakh citizens | क्षयरोग शोध मोहिम : आरोग्य विभागातर्फे १.६७ लाख नागरिकांना गृहभेटी !

क्षयरोग शोध मोहिम : आरोग्य विभागातर्फे १.६७ लाख नागरिकांना गृहभेटी !

Next
ठळक मुद्देनिवडण्यात आलेल्या जोखमीच्या २४० क्षेत्रातील एकूण १ लाख ६७ हजार ४५७ लोकसंख्येला गृहभेटी देण्याचे नियोजन होते. कर्मचारी वर्ग यांच्या पथकांनी निवडलेल्या भागांत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले. क्षयरोगाची लक्षणे आढळून येणाऱ्या जवळपास ५२ व्यक्तींच्या थुंकी नमुने गोळा करून तपासणीकरीता पाठविण्यात आले.

वाशिम: क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्ह्यात १८ जून ते ३० जून या  दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. १.६७  लाख नागरिकांना गृहभेटी देऊन जनजागृती केली.
क्षयरूग्णांची संख्या कमी करणे तसेच यासंदर्भात जनजागृती करणे, क्षयरुग्णांना उपचाराखाली आणणे या उद्देशाने आरोग्य विभागाने गृहभेटी हा उपक्रम राबविला. या मोहिमेसाठी वाशिम जिल्ह्यात क्षयरोग अधिकारी व आशा सेविका, स्वयंसेवक यांच्या २४४ चमू तयार केल्या होत्या. जिल्ह्यातील निवडण्यात आलेल्या जोखमीच्या २४० क्षेत्रातील एकूण १ लाख ६७ हजार ४५७ लोकसंख्येला गृहभेटी देण्याचे नियोजन होते. १.६७ लाख नागरिकांना गृहभेटी देऊन संवाद साधण्यात आला. या मोहिमेतून जवळपास ५२ संशयित  रू्ण आढळून आले आहेत. थुंकी तपासणे, आवश्यकतेनुसार क्ष-किरण तपासणीसह इतर तपासण्या करून निदान करून संशयित आढळणाºयांवर  औषधोपचार केले जाणार आहेत. सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाºयांचे भागधारक, अशासकीय संस्था, तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग यांच्या पथकांनी निवडलेल्या भागांत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केले. सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवक आदींनी  गृहभेटीसाठी परिश्रम घेतले. क्षयरोगाची लक्षणे आढळून येणाऱ्या जवळपास ५२ व्यक्तींच्या थुंकी नमुने गोळा करून तपासणीकरीता पाठविण्यात आले.

Web Title: TB diagnostic campaign: Health department visits 1.67 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.