'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 04:08 PM2018-12-23T16:08:42+5:302018-12-23T16:15:25+5:30

वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. 

'Swabhimani' will fight on self: Ravi Kant Tupkar | '...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पुर्वीपेक्षा सद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार वाढलेला आहे. त्यामुळे महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाने सहा जागांवर दावा केला आहे. एका जागेवर अजिबात समाधान मानले जाणार नसून महाआघाडीने उपकाराची भाषा बोलून आम्हाला गृहित धरू नये. याऊपरही वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. 

स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या जनविरोधी धोरणांमुळे रोष ओढवून घेतलेल्या विद्यमान भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी एकत्रित येवून निवडणूक लढावी, अशी जनतेचीच अपेक्षा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने या जनमताचा आदर राखून जमिनीवरच राहावे, असे तुपकर म्हणाले. 
सत्तापरिवर्तनात शेतकºयांची भुमिका सर्वात मोठी असून पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला सोडण्याची उपकारित भाषा महाआघाडीने करू नये. ‘स्वाभिमानी’ने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. तो शेवटपर्यंत कायम राहणार असून त्यात कुठलाच बदल आम्हाला मान्य नाही. तसेही शेतकºयांच्या प्रश्नांवर अहोरात्र झटणाºया राजू शेट्टी यांना सोबत घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणे सोपे नसल्याने महाआघाडीने आम्हाला गृहित धरून केवळ एक जागा दिल्यास तिसरी आघाडी उघडून ‘स्वाभिमानी’ स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असेही रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: 'Swabhimani' will fight on self: Ravi Kant Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.