शासकिय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:33 PM2017-10-12T13:33:23+5:302017-10-12T13:33:43+5:30

Successful success of various residential schools of government school students | शासकिय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

शासकिय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त घेण्यात आल्या विविध स्पर्धा .

मंगरुळपीर  : वन्यजीव संवर्धन सप्ताह मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत येथील अनू.जाती मुलांची शासकिय निवासी शाळा, तुळजापुर ता.मंगरुळपीर येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

स्थानिक मंगरुळपीर येथील सांस्कृतीक भवनामध्ये १ आॅक्टोंबर ते ७ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेत अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा तुळजापुर ता.मंगरुळपीर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर गणेश जामनिक, भारत राऊत,तुषार धवने, प्रविण इंगोले, सुरज बळी, अनिकेत दबडघाव,करण तायडे या विद्यार्थ्यांनी ऊत्तम यश प्राप्त केले.त्यामुळे त्यांचा समितीकडुन सन्मानचिन्ह आणी प्रशस्तीपत्रक देवून गौरविन्यात आले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे  समाजकल्याण सहाय्यक ऊपायुक्त माया केदार,समाजकल्याण अधिकारी ए.व्हि.मुसळे, शाळेचे मुख्याध्यापक एल झेड सुरजुसे  यांनी कौतुक केले असुन या यशासाठी सुमेध चक्रनारायण,संदिप सातपुते,फुलचंद भगत,रविंद्र चव्हाण,कोमल तिरपुळे,गुलाब घरडे,राष्ट्रपाल आडोळे, रश्मी निराळे, मंगेश हुड, मिना भगत आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

Web Title: Successful success of various residential schools of government school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.