मंगरूळपीर, मानोरा येथील तहसील कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:12 AM2017-10-12T01:12:44+5:302017-10-12T01:13:22+5:30

मंगरूळपीर : राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबईच्यावतीने राज्यातील महसूल कर्मचार्‍यांच्या विविध मागणीसंदर्भात राज्यभर आंदोलन सुरू आहे. मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहेत.

The strike of tahsil employees in Mangrulapir, Manora | मंगरूळपीर, मानोरा येथील तहसील कर्मचारी संपावर

मंगरूळपीर, मानोरा येथील तहसील कर्मचारी संपावर

googlenewsNext
ठळक मुद्देबेमुदत संपपुरवठा विभागाचे संपूर्ण काम ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क

मंगरूळपीर : राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबईच्यावतीने राज्यातील महसूल कर्मचार्‍यांच्या विविध मागणीसंदर्भात राज्यभर आंदोलन सुरू आहे. मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २६ सप्टेंबर २0१७ रोजी विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्या निवेदनावर कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने राज्यातील महसूल कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मंगरुळपीर महसूल क र्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय खिराडे यांनी त्याबाबतचे निवेदन तहसीलदार वाहुरवाघ यांना देऊन कामबंद आंदोलनास १0 ऑक्टोबर रोजी प्रारंभ केला. निवेदनात नमूद केले, की पुरवठा विभागामधील निरीक्षक हे पद सरळ सेवेने भरल्यास महसूल विभागातील अव्वर कारकून दर्जाच्या कर्मचार्‍यांवर अन्याय होणार आहे. या प्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. मंगरुळपीर तालुक्या तील सर्व महसूल कर्मचारी, पदोन्नत नायब तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनाची दखल घेऊन महसूल कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर त त्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. निवेदनावर महसूल सर्व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय खिराडे, रेणुका चव्हाण, आर.पी. ठोंबरे, अनिल खंडरे, एस.डी. मिरासे, एस.एस. भरगडे, अनंता राठोड, के.डी. जाधव, एस. एस. खारोडे, व्ही.के. वानखडे, एन. एस. वरकाडे, एम.के. सु पनर, नरेंद्र इंगोले, एन.एस. सातंगे, एस.ए. जामनिक, आर.के. कांबळे, व्ही.आर. कांबळे यांच्यासह कर्मचार्‍यांच्या स्वाक्षरींचे निवेदन देण्यात आले. मानोरा येथेही आंदोलन मानोरा - महसूलविषयक विविध मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक विचार करावा, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मानोरा येथील तहसील कार्यालयाच्या व पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ुमानोरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महसूल कर्मचार्‍यांच्याव तीने १0 ऑक्टोबर रोजी बेमुदत काम बंद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी पुरवठा निरीक्षक हे पद पदोन्नतीद्वारे भरण्यात यावे, ते सरळ सेवेने भरण्यात येऊ नये, या मागणीकरिता अव्वल कारकून दर्जाच्या महसूल कर्मचार्‍यांनी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप आडे यांच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलनाची सुरुवात केली आहे. यासंदर्भात मानोरा तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देण्यात आले. अमित किल्लेदार, लीला चवरे, बी.डी. गायकवाड, मनवर, ए.एम. चव्हाण, एम.ए. गरुड आदी महसूल कर्मचार्‍यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. -

Web Title: The strike of tahsil employees in Mangrulapir, Manora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.