रस्त्याच्या मागणीसाठी सावरगाव फॉरेस्ट गावकऱ्यांचा रास्ता रोको;  मानोरा-कारपा मार्गावरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:31 PM2018-01-31T18:31:07+5:302018-01-31T18:32:02+5:30

मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आणि विविध टप्प्यात आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून ३१ जानेवारी रोजी गावकऱ्यांनी मानोरा ते कारपा मार्गावर रास्ता रोको केला.

Stop the way for the demands of the roads of Savargaon forest | रस्त्याच्या मागणीसाठी सावरगाव फॉरेस्ट गावकऱ्यांचा रास्ता रोको;  मानोरा-कारपा मार्गावरील वाहतूक ठप्प

रस्त्याच्या मागणीसाठी सावरगाव फॉरेस्ट गावकऱ्यांचा रास्ता रोको;  मानोरा-कारपा मार्गावरील वाहतूक ठप्प

Next
ठळक मुद्देतालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही.रस्ता होण्याच्या मागणीसाठी गत काही वर्षापासून सावरगाववासी लढा देत आहेत. मानोरा तहसिलदारांना निवेदन देत याकडे लक्ष द्यावे अन्यथा ३१ जानेवारीला रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.

मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आणि विविध टप्प्यात आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून ३१ जानेवारी रोजी गावकऱ्यांनी मानोरा ते कारपा मार्गावर रास्ता रोको केला. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. 

तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. रस्ता होण्याच्या मागणीसाठी गत काही वर्षापासून सावरगाववासी लढा देत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नागरिकांनाी मतदानावर बहिष्कार घातला होता. त्यांनतर सन २०१५ मध्ये नागरिकांनी बेमुदत उपोषणही केले होते. एका महिन्याच्या आत हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन गावकºयांना मिळाले होते.   मात्र, अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नाही.  १७ जानेवारी रोजी सावरगाववासीयांनी मानोरा तहसिलदारांना निवेदन देत याकडे लक्ष द्यावे अन्यथा ३१ जानेवारीला रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.  प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर ३१ जानेवारी रोजी कारंजा-मानोरा मार्गावरील कारपा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने उद्भवणाºया समस्यांचा पाढाच गावकºयांनी वाचला. गावात सध्या पाणीटंचाईदेखील गंभीर बनली आहे. सावरगाव फॉरेस्ट येथील रस्ता हा वन विभागाच्या अखत्यारित येतो. वनविभागाच्या जाचक अटीमुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. आंदोलनात मनोहर पाटील, विष्णू जाधव, दीपक जाधव, युवराज राठोड, मरीस उदयसिंग पवार, शंकर चव्हाण, आशिष चव्हाण, नीलेश राठोड, अशोक ढोके, रामकृष्ण पारधी, नरहरी उघडे आदींची उपस्थिती होती. रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. कारंजा येथून अप-डाऊन करणारे शिक्षक व अन्य शासकीय कर्मचाºयांची मात्र मोठी गोची झाली होती. घटनास्थळी वनविभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी पी.एन.नानोटे, नायब तहसिलदार भोसले, पोलिस उपनिरीक्षक धर्माजी डाखोर, विश्वास वानखडे यांनी मोठा ताफा तैनात होता. 

Web Title: Stop the way for the demands of the roads of Savargaon forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.