VIDEO: धक्कादायक! शेतीच्या वादातून मुलाने वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली लोटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:26 PM2018-06-22T16:26:51+5:302018-06-22T16:35:27+5:30

तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादातून चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली ढकलल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

Shocking ... son push his mother under tractor after the farming dispute | VIDEO: धक्कादायक! शेतीच्या वादातून मुलाने वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली लोटलं

VIDEO: धक्कादायक! शेतीच्या वादातून मुलाने वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली लोटलं

Next
ठळक मुद्देतालुक्यातील मुंगळा येथे शेती जमीन महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना कसण्यासाठी दिली होती.परंतु ती परत देण्यास दळवी नकार देत असल्याने राऊत यांनी सदर प्रकरण तहसीलमध्ये नेले. निकालानंतर पेरणीसाठी राऊत शेतात गेले असता दळवी येथे येवून त्यांनी स्वत:च्या आईलाच पेरणी करीत असलेल्या ट्रॅक्टरसमोर ढकलले.


मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादातून चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली ढकलल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादावरून झालेल्या मारहाणप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल झालेल्या तक्रारीवरून एकंदरित १२ आरोपींविरूद्ध २१ जून रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असली तरी सदर प्रकरण वेगळेच असल्याची चर्चा असून याचा तपास पोलीस करीत आहेत. सदर जमीन महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना कसण्यासाठी दिली होती. परंतु ती परत देण्यास दळवी नकार देत असल्याने राऊत यांनी सदर प्रकरण तहसीलमध्ये नेले. त्या निकालावरुन राऊत यांच्या बाजुने निकाल लागला. निकालानंतर पेरणीसाठी राऊत शेतात गेले असता दळवी येथे येवून त्यांनी स्वत:च्या आईलाच पेरणी करीत असलेल्या ट्रॅक्टरसमोर ढकलले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

Web Title: Shocking ... son push his mother under tractor after the farming dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.