कृषी विकासाच्या विविध योजनांमुळे शेतकºयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:10 PM2017-08-16T14:10:49+5:302017-08-16T14:11:07+5:30

Releasing to the farmers through various schemes of agricultural development | कृषी विकासाच्या विविध योजनांमुळे शेतकºयांना दिलासा

कृषी विकासाच्या विविध योजनांमुळे शेतकºयांना दिलासा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री राठोड यांचे प्रतिपादन मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा



वाशिम : शेती व शेतकरी यांच्या विकासावर शासनाचा विशेष भर आहे. जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या जलसंधारण व कृषी विकासाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ आॅगस्टला आयोजित मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

पालकमंत्री ना. राठोड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून या काळात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे शेतकºयांना दिलासा मिळत आहे. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातूनही जिल्ह्यात चांगले काम होत आहे. शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकरिता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यात ३१ मे पर्यंत टोकन वाटप केलेल्या सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यानुसार २६ जुलैपासून आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. उर्वरित सर्व शेतकºयांची तूर ३१ आॅगस्ट पूर्वी खरेदी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून याकरिता शासकीय सुट्टीच्या दिवशीही तूर खरेदी सुरु ठेवण्यात आली आहे, असे ना. राठोड यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण अंतर्गत राज्यात सातबारा री-एडिटिंगचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०३ गावांचे री-एडिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. या कामात वाशिम जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे ना. राठोड यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री विशेष सहाय्य निधीतून जिल्हाधिकाºयांना २ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून कारंजा तालुक्यातील भामदेवी गावाचा सर्वांगीण विकास केला जात आहे. या गावात सलग समतल चर, शेततळी, शेडनेटचे काम झाले असून शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी १७० दुधाळ म्हशी, १३० शेळी व १३ बोकडाचे वाटप करण्यात आले आहे. या गावात दुग्धविकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून १००० लिटर क्षमतेचे मिल्क प्रोसेसिंग युनिट उभारले असून, विक्रीसाठी कारंजा शहरात विक्री केंद्र सुध्दा सुरु झाले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाच्या उच्च स्तरीय समितीनं मान्यता दिली आहे. याठिकाणी बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय, खुले सभागृह यासह इतर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

वृक्ष लागवड मोहीम, स्वच्छ भारत अभियान, संत तुकाराम वनग्राम योजना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया ग्रामपंचायती व वन व्यवस्थापन समितींचा यावेळी पालकमंत्री ना. राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रजासत्ताक दिनी मानवी साखळीतून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो तयार करून जागतिक विक्रम स्थापित करण्यामध्ये सहभागी झालेल्या शाळांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.

Web Title: Releasing to the farmers through various schemes of agricultural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.