वाशिम येथे  शुक्रवारपासून विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांची धूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:58 PM2018-02-22T13:58:45+5:302018-02-22T14:02:03+5:30

वाशिम - अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.

Regional sports, cultural tournaments from Friday in Washim! | वाशिम येथे  शुक्रवारपासून विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांची धूम !

वाशिम येथे  शुक्रवारपासून विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांची धूम !

Next
ठळक मुद्देतीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन २३ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या हस्ते होणार आहे.सकाळ व दुपारच्या सत्रात वैयक्तिक, सांघिक प्रकारातील विविध क्रीडा स्पर्धा तर सायंकाळनंतर रात्री १० वाजेपर्यंत विविध प्रकारातील सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत. २५ फेब्रुवारीला बक्षीस वितरण व क्रीडा, सांस्कृतिक स्पधेचा समारोप होणार आहे.


वाशिम - अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलावर २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन २३ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक कलागुणांना व्यासपिठ मिळवून देणे, परस्पर सहकार्य, एकोपा वाढीस लावणे, खेळाडूवृत्तीला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षी विभागस्तरीय स्पर्धा घेण्याचा मान वाशिम जिल्हा परिषदेला मिळाला असून, या स्पर्धची जय्यत तयारी स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आली आहे. २३, २४ व २५ फेब्रुवारी अशा तीन दिवस चालणार या स्पर्धा व महोत्सवाचे उदघाटन २३ फेबुवारीला अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमा तायडे, अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, यवतमाळ अध्यक्ष माधुरी आडे, अमरावती अध्यक्ष नितीन गोंडाणे, बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शन्मुगराजन, यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अमरावतीचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सर्वश्री विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव व पानुताई जाधव, वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. सकाळ व दुपारच्या सत्रात वैयक्तिक, सांघिक प्रकारातील विविध क्रीडा स्पर्धा तर सायंकाळनंतर रात्री १० वाजेपर्यंत विविध प्रकारातील सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत. २५ फेब्रुवारीला बक्षीस वितरण व क्रीडा, सांस्कृतिक स्पधेचा समारोप होणार आहेत. वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख राहतील. यावेळी अमरावती विभागातील अकोला, यवतमाळ बुलडाणा व अमरावती या चारही जि.प. चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धच्या यशस्वीतेसाठी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जि.प. अधिकारी -कर्मचारी क्रीडा मंडळाचे सचिव प्रमोद कापडे यांच्यासह अधिकारी -कर्मचाºयांच्या विविध संघटना परिश्रम घेत आहेत.
 

Web Title: Regional sports, cultural tournaments from Friday in Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.