पावसाअभावी रब्बीवरही घोंगावतेय संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:00 PM2017-10-09T20:00:53+5:302017-10-09T20:01:39+5:30

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ७० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. यामुळे पाणीटंचाई गडद होण्यासोबतच आगामी रब्बी हंगामावरही संकट घोंगावत असल्याचे दिसून येत आहे. 

Rabbi is too much trouble due to rain! | पावसाअभावी रब्बीवरही घोंगावतेय संकट!

पावसाअभावी रब्बीवरही घोंगावतेय संकट!

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त पाणीटंचाई होणार गडद 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ७० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. यामुळे पाणीटंचाई गडद होण्यासोबतच आगामी रब्बी हंगामावरही संकट घोंगावत असल्याचे दिसून येत आहे. 
जिल्ह्यात यंदा पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होण्यासोबतच नापिकीचे संकट शेतकºयांसमक्ष उभे ठाकले. परिणामी सोयाबीनचे उत्पादन ६० टक्याने घटले आहे. यासह सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी प्रचंड प्रमाणात खालावल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसावणार असून रब्बी हंगामही धोक्यात सापडला आहे. 

Web Title: Rabbi is too much trouble due to rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.