शिवजयंतीनिमित्त होणा-या महारॅलीसंदर्भात जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:43 PM2018-02-14T14:43:11+5:302018-02-14T14:43:26+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला येथे सद्भावना मोटारसायकल रॅली व विविध स्पर्धांचे आयोजन केले

Public awareness about Maharajas on Shiv Jayanti! | शिवजयंतीनिमित्त होणा-या महारॅलीसंदर्भात जनजागृती !

शिवजयंतीनिमित्त होणा-या महारॅलीसंदर्भात जनजागृती !

googlenewsNext

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला येथे सद्भावना मोटारसायकल रॅली व विविध स्पर्धांचे आयोजन केले असून, यासंदर्भात जनजागृती म्हणून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १३ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजता वाशिम तालुक्यातील वारा जहॉगीर येथे बैठक घेण्यात आली.

शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, १९ फेब्रुवारीला वाशिम येथे महारॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत शहरी व ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहावी, म्हणून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने ग्रामीण भागात बैठका घेतल्या जात आहेत. मंगळवारी वारा जहॉगीर येथील महादेव मंदिरातील माता अहिल्याबाई होळकर सभामंडप येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला वारा जहागीर सर्कल मधील आसपासच्या गावचे जवळपास १०० युवक व गावकरी मंडळी उपस्थित होते. १९ फेब्रुवारीला होणाºया महारॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहू असे आश्वासन दिले. वाशिम येथील वाटाणे लॉन येथे १५ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा, स्वच्छ वाशिम, सुंदर वाशिम व पाण्याची बचत काळाची गरज या विषयांवर रांगोळी स्पर्धा होणार आहे.

याशिवाय १५, १६ व १७ फेबु्रवारीदरम्यान ‘चालता बोलता’ ही स्पर्धा होणार असून शहरातील शाळा, महाविद्यालये व मुख्य चौकांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात येणार आहे. १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५ वाजता काजळांबा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा  युवक’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होईल. याचदिवशी सकाळी ११ वाजता वाशिम येथील शिवाजी हायस्कुल येथून सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रम व रॅलीसंदर्भात वारा जहॉगीर येथील बैठकित माहिती देण्यात आली. या बैठकीला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हुकूम तुर्के, सचिव सुशील भिमजियानी, उपाध्यक्ष बाळू मुरकुटे, राजू धोंगडे, स्पर्धा संयोजक दीपक मादस्वार, रामदास गाडेकर, राजू कोंघे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Public awareness about Maharajas on Shiv Jayanti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.