पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ  बैलगाडीत काढली मोटारसायकल मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:31 PM2018-05-26T15:31:03+5:302018-05-26T15:31:03+5:30

रिसोड : पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ रिसोड तालुका युवक काँग्रेसच्यावतिने बैलगाडीत मोटारसायकलची मिरवणूक काढून तहसीलदारांना २६ मे रोजी निवेदन दिले.

protest against petrol price hike; Motorcycle put in a bullock cart | पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ  बैलगाडीत काढली मोटारसायकल मिरवणूक

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ  बैलगाडीत काढली मोटारसायकल मिरवणूक

Next
ठळक मुद्दे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेधार्थ काँग्रेसच्यावतिने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये बैलबंडीतून काढण्यात आलेली मोटारसायकलच्या मिरवणुकीने जनतेचे लक्ष वेधले होते.

रिसोड : पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ रिसोड तालुका युवक काँग्रेसच्यावतिने बैलगाडीत मोटारसायकलची मिरवणूक काढून तहसीलदारांना २६ मे रोजी निवेदन दिले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की,केंद्रातील भाजप सरकार देशात येवून चार वर्ष पूर्ण झालीत. सत्तेत येण्यापूर्वी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाहीत. त्यात पेट्रोल दरवाढ भरमसाठ करुन सर्वांना फटका सहन करावा लागत आहे. तसेच शेतकºयांच्या विरोधात आठमुठया धोरणामुळे जगाचा पोशिंदा नाहक आपला जीव गमावत आहे. या व ईतर केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेधार्थ काँग्रेसच्यावतिने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये बैलबंडीतून काढण्यात आलेली मोटारसायकलच्या मिरवणुकीने जनतेचे लक्ष वेधले होते. या आंदोलनात युवानेते सचिन इप्पर, तालुकाध्यक्ष प्रकाशराव वायभासे, डॉ. संतोषराव बाजड, शहराध्यक्ष राजुभाऊ राऊत, सुरेशमामा वाघ, गजानन निखाते, रियाजभाई, समाधान घोळवे, राहुल भुतेकर, गोपाल मोरे, गणेश चोपडे, शामराव लाटे, विश्वनाथ वायभासे, गोपाल सरनाईक, सरताज भाई, मनोज सानप, विश्वास गरकळ, मनोज गरकळ, ज्ञानेश्वर माटे, अरुण घामोडे, गजानन खडसे, रामभाऊ वायभासे, योगेश कौटकर, संतोष झरे, संतोष भुतेकर, बाळु बिल्लारी, रवी भुतेकर, आसाराम चव्हाण, ऋषिकेश झनक,विनोद बोरकर, शुभम सुरशे, भागवतराव बोरकर, शाहरुख देशमुख, मोहन खराटे, गणेश देशमाने, नंदकिशोर नव्हाळे, अविनाश सावसुंदर, अरुण खरोटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: protest against petrol price hike; Motorcycle put in a bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.