मालेगाव येथे तहसिल प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 06:37 PM2018-04-20T18:37:21+5:302018-04-20T18:37:21+5:30

मालेगाव (वाशिम) : मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी शुक्रवार, २० एप्रिल रोजी मालेगाव शहरातील पेट्रोलपंपांची तपासणी करून चुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

Petrol pump inspection by Tahsil administration at Malegaon! | मालेगाव येथे तहसिल प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तपासणी!

मालेगाव येथे तहसिल प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तपासणी!

googlenewsNext
ठळक मुद्दे यासंदर्भातील अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात येणार आहे.तालुक्यातील उर्वरित इतर पेट्रोल पंपाची देखील लवकरच तपासणी केली जाईल.

मालेगाव (वाशिम) : तालुका दक्षता समितीच्या सभेत समितीचे अध्यक्ष तथा आमदार अमित झनक तसेच दक्षता समितीच्या इतर सदस्यांनी केलेल्या सुचनांचे पालन करून मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी शुक्रवार, २० एप्रिल रोजी मालेगाव शहरातील पेट्रोलपंपांची तपासणी करून चुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

मालेगाव शहरातील शाम आॅटोमोबाईल्स, जगदंबा पेट्रोलपंप, माँ. शाकंबरी आॅटोमोबाईल्स, साई पेट्रोलियम आदी पेट्रोलपंपांना भेट देवून तेथील ‘हायड्रो मीटर रीडिंग’, आवक, विक्री आणि शिल्लक साठा, अग्निशमन व्यवस्था, हवा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाव फलक, साठा तक्रार पुस्तक, विक्री रजिस्टर, डेन्सीटी रजिस्टर, पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र मुत्रीघराची व्यवस्था आदींचा समावेश होता. यासंदर्भातील अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील उर्वरित इतर पेट्रोल पंपाची देखील लवकरच तपासणी केली जाईल, असे तहसीलदार राजेश वजीरे यांनी सांगितले. या तपासणी मोहिमेत पुरवठा निरीक्षक रवी राऊत व नीलेश राठोड यांनी सहभाग घेतला. 

Web Title: Petrol pump inspection by Tahsil administration at Malegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.