तऱ्हाळा येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा उत्साहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:14 PM2017-12-05T14:14:44+5:302017-12-05T14:18:48+5:30

वाशिम: तऱ्हाळा (ता.मंगरूळपीर) येथील संत भायजी महाराज यांच्या यात्रेनिमित्त संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेवर आधारीत विदर्भस्तरीय भजन स्पर्धा शनिवारी पार पडली. 

The Khangzei bhajan competition in Tarhal, Vidarbha! | तऱ्हाळा येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा उत्साहात!

तऱ्हाळा येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा उत्साहात!

Next
ठळक मुद्देसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेवर आधारीत स्पर्धा.संत भायजी महाराज यांच्या यात्रेनिमित्त स्पर्धा.


वाशिम: तऱ्हाळा (ता.मंगरूळपीर) येथील संत भायजी महाराज यांच्या यात्रेनिमित्त संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेवर आधारीत विदर्भस्तरीय भजन स्पर्धा शनिवारी पार पडली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय मनवर होते. उद्घाटन संजय मिसाळ यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून समाधान भगत, राजू तायडे, प्रशांत सोनुने, पांडुरंग काठोळे यांची उपस्थिती होेती. विदर्भातून अनेक नामवंत भजनी मंडळींनी भजन सादर केले. यावेळी बोलताना मनवर म्हणाले की, ग्रामगिता ही खरोखरच जीवन जगण्याची कला शिकविण्याचे काम करते. त्यात अतिशय साध्या शब्दात आनंदी जिवन जगण्याचे नियम सांगितले आहेत. राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात केले तर प्रत्येकाचे निश्चीत कल्याण होईल, असे ते म्हणाले. तत्पुर्वी विजय आगळे यांनी प्रास्ताविकातून गेल्या ७० वर्षापासुन सुरू असलेल्या संत भायजी महाराज यांच्या यात्रेविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास सावध, दिलीप भगत, आत्माराम बायस्कर व गावकºयांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अमोल जागृत यांनी; तर आभार प्रदर्शन प्रदिप बायस्कर यांनी केले. यावेळी गावकºयांची उपस्थिती होती.

Web Title: The Khangzei bhajan competition in Tarhal, Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.