जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:17 PM2018-04-09T15:17:41+5:302018-04-09T15:17:41+5:30

वाशिम : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उष्माघातामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागाने पुढाकार घेत जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

In the hospitals heat stroke chamber is started! | जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू!

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू!

Next
ठळक मुद्देउन्हाच्या झळांमुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर नागरीकांना उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. सातत्याने वाढणाऱ्या  तापमानाची दखल घेऊन आरोग्य विभागाने रुग्णांच्या सोयीसाठी उष्माघात कक्ष सुरु केले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये एक विशेष खोली आणि त्यात एसी, कुलर यासह इतर सुविधा उपलब्ध.

 
वाशिम : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उष्माघातामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागाने पुढाकार घेत जिल्हा सामान्य रुग्णालयासह वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. 
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढून दुपारपर्यंत तापमान ४० अश सेल्सियसच्याही पलिकडे जात आहे. तीव्र उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर नागरीकांना उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सातत्याने वाढणाऱ्या  तापमानाची दखल घेऊन आरोग्य विभागाने रुग्णांच्या सोयीसाठी उष्माघात कक्ष सुरु केले आहेत. त्यानुसार, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये एक विशेष खोली आणि त्यात एसी, कुलर यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी दिली.

Web Title: In the hospitals heat stroke chamber is started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.