कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:31 PM2017-11-07T13:31:35+5:302017-11-07T13:33:23+5:30

कारंजा लाड : शासनाच्यावतीने कारंजा येथे उपजिल्हा रूग्णालय जनसेवेत त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी डॉ.महेश चव्हान आरोग्य जनसंपर्क मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाशल्य चिकित्सक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

hospital building at Karanja waiting for inaguration | कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

Next
ठळक मुद्देरूग्णालय त्वरीत सुरू करण्याची मागणी

कारंजा लाड : शासनाच्यावतीने कारंजा येथे उपजिल्हा रूग्णालय जनसेवेत त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी डॉ.महेश चव्हान आरोग्य जनसंपर्क मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाशल्य चिकित्सक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदनात डॉ. महेश चव्हान यांनी नमुद केले की, कारंजा येथील ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आलेले आहे. शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य अशी ईमारत उभारण्यात आली, पंरतू सदर उपजिल्हा रूग्णालयाकरीता आवश्यक असलेली पदभरती व रूग्णालयासाठी आवश्यक यंत्र सामुग्री अजुनपर्यंत उपलब्ध करण्यात आलेली नसल्यामुळे रूग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. कारंजा व मानोरा तहसीलमध्ये अंदाजे २६० ते २७० गावांचा समावेश असून विविध प्रकाराच्या आजाराने ग्रस्त रूग्णांसाठी कोणत्याही प्रकाराची योग्य ती सुविधा उपलब्दनाही कारंजा शहरालगत औरगांबाद नागपुर महामार्ग असल्यामुळे सदर मार्गावर बरेच अपघात घडतात. वेळेवर गंभीर रूग्णांवर उपचार होत नसल्यामुळे बºयाच नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले.तालुक्यात योग्य उपचार सुविधा उपलब्द नसल्यामुळे रूग्णांना उपाचारासाठी ईतर जिल्हाच्या ठिकाणी जावे लागत आहे. शासनाने कोटयावधी रुपये खर्च करून सुध्दा उपजिल्हा रूग्णालय आजपर्यंत जनसेवेत सुरू न झाल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब नागरीकांचे हाल होत आहे. सदर उपजिल्हा रूग्णालयामध्ये मंजुर करण्यात आलेली पदे त्वरीत भरण्यात यावी तसेच रूग्णालयाकरीता आवश्यक असलेली यंत्र सामुग्री उपलब्ध करून उपजिल्हा रूग्णालय त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी डॉ. महेश चव्हान आरोग्य जनसंपर्क मित्र मंडळ कारंजाच्यावतीने डॉ.महेश चव्हान, डॉ बी.एम.राठोड, दिनेश राठोड, धनराज हेडा, सागर राऊत, पवन गुल्हाने, रमेश राठोड, सुमित डहाके, गणेश लुंगे, भारत लुंगे, सागर पाटील, कमलेश कडोळे, विशाल राउत, चंद्रकांत आडोळकर, विक्की राठोड, चेतन राठोड, आकाश राठोड, पवन चव्हान, गोलु यादव, नरेश मुंदे यांनी केले आहे.

Web Title: hospital building at Karanja waiting for inaguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.