विविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 04:13 PM2019-07-22T16:13:38+5:302019-07-22T16:14:15+5:30

गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी २२ जुलै रोजी स्थानिक पुसद नाका येथे सकाळी ११ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. 

Gor sena agitation for various demands in washim | विविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको

विविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बोगस जात वैधता प्रमाणपत्रधारकांना प्रतिबंध करणे, खोटी प्रमाणपत्रे मिळविणाºयांविरूद्ध कारवाई करावी यासह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी २२ जुलै रोजी स्थानिक पुसद नाका येथे सकाळी ११ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. 
अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गात मोडणाºया व्यक्तींना घ्यावयाचे लाभ किंवा संरक्षण या प्रवर्गात न मोडणाºया व्यक्ती जातीचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून मिळवित असल्यामुळे खºया मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाºया व्यक्तींवर अन्याय होत आहे. या प्रकारामुळे मागासप्रवर्गात मोडणाºया खºया व्यक्ती लाभ, सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप यावेळी गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी केला. खोटे प्रमाणपत्र आढळल्यास दक्षता अधिकारी, जात दाखले देणारे अधिकारी आणि वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बनावट कागदपत्र बनविणे, सादर करणे, त्याचा वापर करणे, संघटीतरित्या लाभ घेणे, महसुली पुरावे यामध्ये खोडाखोड करणे, बदल करणे, फेरफार करणे, शालेय व वास्तव्याचे बनावट पुरावे सादर करणे, अफरातफर, संगनमत आदी गुन्ह्याबाबत संबंधितांवर भादंवी कलम ४२०, ४६२, ४६५, ४७१ या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, काही नव्याने रक्तनाते संबंध दाखवून मागासप्रवर्गात घुसखोरी करणाºयांचा शोध घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.  मागासवर्गीयासांठी असलेली अनुदाने, कर्जे अशा बोगस लाभार्थींनी लाटलेली आहेत. यासाठी सर्व स्तरावर शोध मोहिम राबविण्यात यावी  आदी मागण्यांसाठी गोर सेनेने पुसद नाका चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास चालले्ल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात गोर सेनेचे जिल्हा सचिव नीलेश राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Gor sena agitation for various demands in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.