वाशिम जिल्ह्यातील इंगलवाडी, जयपूर सिंचन प्रकल्पांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:57 PM2017-12-05T17:57:05+5:302017-12-05T17:59:38+5:30

कारंजा लाड (वाशिम): ‘फॉरेस्ट राईट अ‍ॅक्ट’चे प्रमाणपत्र अप्राप्त असणे व भुसंपादनाचा मुद्दा रखडल्याने प्रलंबित असलेल्या इंगलवाडी आणि जयपूर सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनस्तरावर हा तिढा सुटल्याने लवकरच प्रकल्पांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी मंगळवारी दिली.

Free the way of Inglwadi, Jaipur irrigation projects in Washim district | वाशिम जिल्ह्यातील इंगलवाडी, जयपूर सिंचन प्रकल्पांचा मार्ग मोकळा

वाशिम जिल्ह्यातील इंगलवाडी, जयपूर सिंचन प्रकल्पांचा मार्ग मोकळा

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार पाटणी यांची माहितीप्रकल्पांची कामे होणार लवकरच सुरू

कारंजा लाड (वाशिम): ‘फॉरेस्ट राईट अ‍ॅक्ट’चे प्रमाणपत्र अप्राप्त असणे व भुसंपादनाचा मुद्दा रखडल्याने प्रलंबित असलेल्या इंगलवाडी आणि जयपूर सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनस्तरावर हा तिढा सुटल्याने लवकरच प्रकल्पांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी मंगळवारी दिली.
इंगलवाडी येथील प्रकल्पासाठी जवळपास ३० हेक्टर जमिन भुसंपादीत करण्यात आली असून त्यात ई-क्लास, खाजगी तसेच वनजमिनीचा समावेश होता. या प्रकल्पासाठी ६३८ लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला होता. तसेच कामाला सुरूवात देखील झाली होती. मात्र, केवळ ७ हेक्टर वनजमिनीअभावी हा प्रकल्प रखडला होता. वाशिम तालुक्यातील जयपुर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी शासनाने १४३.४९ कोटी रूपयास प्रशासकीय मान्यता दिली होती. जवळपास १९९ हेक्टर शेतजमीनीवर हा प्रकल्प उभारला जाणार असून केवळ २४.४२ हेक्टर वनजमीनीमुळे हा प्रकल्प देखील रखडला होता. दरम्यान, ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या, त्याचा मोबदला म्हणून लघु पाटबंधारे विभागाने महसुल विभागाकडे ३३.१५ कोटी रुपये अदा केले आहेत. यासंदर्भात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सलग पाठपुरावा केल्याने अखेर दोन्ही सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच प्रकल्पांची उर्वरित कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती आमदार पाटणी यांनी दिली.

Web Title: Free the way of Inglwadi, Jaipur irrigation projects in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण