कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 06:48 PM2019-03-20T18:48:31+5:302019-03-20T18:49:07+5:30

शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून सैलानीकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या वाहनाला नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा गावानजीक झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली.

Four killed in car accident in washim district | कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार !

कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून सैलानीकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या वाहनाला नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा गावानजीक झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली. सर्व मृतक हे नागपूर येथील रहिवासी आहेत.
एमएच ४९ बी ७०१९ क्रमांकाच्या झायलो गाडीने नागपूर येथील भाविक दर्शनासाठी सैलानीकडे होते. दरम्यान  नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा ता. मंगरूळपीर गावानजीक समोरून येणाºया एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि झायलो गाडी ही चार ते पाच वेळा रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात मुस्कान शे. सलीम (२३), वहिदा शे. गुलामनबी (४०), सलीमखान अब्दुल कासम (५०), रा. बडा ताज दर्गाह नागपूर हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी असलेल्या अलिया शे. इमरान (६), शे. हरीष शे. इमरान (७), शे. नाजीमा परवीन (२६) अलबिरा शे. इमरान (४) यांना उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. झायलो वाहनामध्ये एकाच कुटुंबातील ११ जण दर्शनासाठी सैलानीकडे जात होते. चालक शे. इमरान हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास शेलुबाजार चौकिचे पोलीस तसेच मंगरूळपीरचे पोलीस करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर एका मृतकाचे नाव कळू शकले नाही.

Web Title: Four killed in car accident in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.