नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला अपघात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 08:36 PM2017-12-03T20:36:30+5:302017-12-03T20:42:23+5:30

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील दोनद बु. गावाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला भीषण अपघात होवून नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी अपघातानंतर रास्तारोको आंदोलन करून रोष व्यक्त केला.

Fierce accidents in the Charkhaikhi vehicle on the Nagpur-Aurangabad highway | नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला अपघात!

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला अपघात!

Next
ठळक मुद्देअपघातात नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी दोनद बु. जवळ खड्डयांमुळे झाला अपघात; संतप्त नागरिकांचा रास्तारोको!महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डा बाजार (वाशिम): नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील दोनद बु. गावाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला भीषण अपघात होवून नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी अपघातानंतर रास्तारोको आंदोलन करून रोष व्यक्त केला. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. 
याबाबत प्राप्त माहितीनुसार, दोनद बु. या गावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडलेला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यास बांधकाम विभागाने जुमानले नाही. अशातच ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर येथील एक दाम्पत्य औरंगाबाद येथे कुटूंबासह मारुती सुझूकी सलेरियो या (क्रमांक एमएच ३१ एफ ए ०१६१) वाहनाने जात असताना ते खड्डयात आदळून भीषण अपघात झाला. यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यासोबतच पती-पत्नीसह एक वृद्ध इसम गंभीररित्या जखमी झाला. जखमींना तातडीने कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

 
अपघातानंतर घटनास्थळी गोळा झालेल्या जमावाने रास्तारोको आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच धनज बु. पोलिस स्टेशनचे ठाणेदार मानकर यांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही याची कल्पना दिली. त्यानंतर तातडीने पावले उचलत बांधकाम विभागाने खड्डा बुजविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Fierce accidents in the Charkhaikhi vehicle on the Nagpur-Aurangabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात