शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 04:05 PM2019-05-26T16:05:36+5:302019-05-26T16:05:42+5:30

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालायचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी २८ मेपर्यंत सादर करावे.

Deadline for submission of pending scholarships application to May 28! | शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत!

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी (फ्रीशिप) योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालायचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी २८ मेपर्यंत सादर करावे. त्यानंतर अर्ज स्विकारणे बंद होणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिली. 
शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रीका, जात प्रमाणपत्र, संबंधित शैक्षणिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्याचे जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास), गॅप आणि ट्रान्स्फर प्रमाणपत्र (लागू असल्यास), महाविद्यालयाच्या प्रचार्यांचे  दुबार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, महाईस्कॉल पोर्टलवर आॅनलाईन अर्ज केल्याची प्रिंट व व अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी. २८ मे पर्यंत या अर्जांबाबत कार्यवाही न केल्यास व प्रलंबित अर्ज शासन निर्णयानुसार सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर न केल्यास संबंधित महाविद्यालयांचे अर्ज नस्ती बंद करण्यात येतील व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कॉलेज, शाळेच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांची राहील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Deadline for submission of pending scholarships application to May 28!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.