विमा योजनेत सहभागाची आज अंतिम मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:43 AM2017-07-31T01:43:55+5:302017-07-31T01:44:06+5:30

शिरपूर जैन: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ असून शेतक-यांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रविवार, ३० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व बँका सुरू ठेवणत आल्या.

Deadline for participation in insurance plan today | विमा योजनेत सहभागाची आज अंतिम मुदत

विमा योजनेत सहभागाची आज अंतिम मुदत

Next
ठळक मुद्देसुटी असतानाही सुरू राहिल्या बँका!

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ असून शेतक-यांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रविवार, ३० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व बँका सुरू ठेवणत आल्या; मात्र या बँकांना शेतकºयांची प्रतीक्षा असल्याचे रविवारी शिरपूर परिसरात दिसून आले.
खरीप हंगामाकरिता नऊ पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना नुकसान भरपाई मिळणार आहे. ३१ जुलैपूर्वी पीक विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी बँकेत गर्दी होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये विमा हप्ता स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच रविवार हा सुटीचा दिवस असतानाही बँका सुरू ठेवण्यात आल्या; मात्र शिरपूर परिसरातील बँक आॅफ महाराष्ट्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर येथील शाखेत शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखेत २९ जुलैपर्यंत केवळ १,५३० शेतकºयांनी पीक विमा उतरविला आहे. रविवारी बँक आॅफ महाराष्ट्र शाखा शिरपूर व जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिरपूर येथे शुकशुकाट दिसून आला.

Web Title: Deadline for participation in insurance plan today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.