मंगरुळपीर तालुक्यातील धरणांची पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 03:29 PM2018-06-30T15:29:48+5:302018-06-30T15:33:44+5:30

वाशिम: जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दमदार पाऊस पडत आहे. त्यातच मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. यामुळे या तालुक्यातील धरणांची पातळी आता वाढली आहे. 

The dams in Mangarulpir taluka increased | मंगरुळपीर तालुक्यातील धरणांची पातळी वाढली

मंगरुळपीर तालुक्यातील धरणांची पातळी वाढली

Next
ठळक मुद्देतालुक्यातील निम्म्याहून अधिक धरणे हिवाळ्यातच कोरडी पडली होती. तालुक्यात २९ जूनपर्यंतच वार्षिक सरासरीच्या ४३ टक्के पावसाची नोंदही झाली आहे.त्यामुळे या तालुक्यातील धरणांत चांगलाच जलसंचय झाला. धरणांची पातळी २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. 

वाशिम: जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दमदार पाऊस पडत आहे. त्यातच मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. यामुळे या तालुक्यातील धरणांची पातळी आता वाढली आहे. 

मंगरुळपीर तालुक्यात एकूण १५ लघू प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पावर पाणी पुरवठा योजना क ार्यान्वित असताना गतवर्षी अपुºया पावसामुळे तालुक्यातील निम्म्याहून अधिक धरणे हिवाळ्यातच कोरडी पडली होती. त्यामुळे तालूक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. रखरखत्या उन्हात दोन तीन किलोमीटर पायपीट करून ग्रामस्थांनी तहान भागविली. त्यातच मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा धरणात, तर उन्हाळ्यात पाण्याचा थेंबही उरला नव्हता. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या मंगरुळपीर शहरासह इतर २७ गावांत पाण्यासाठी हाहाकार सुरू झाला होता. शहरात खाजगी टँकरचा आधार लोक घेत होते. त्यामुळे खाजगी टँकरधारकांनीही आपले दाम दुप्पट केले. आता यंदा जून महिन्यातच जोरदार पाऊस पडला आहे. मंगरुळपीर तालुक्यात २९ जूनपर्यंतच वार्षिक सरासरीच्या ४३ टक्के पावसाची नोंदही झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील धरणांत चांगलाच जलसंचय झाला आहे. धरणांची पातळी २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. 

Web Title: The dams in Mangarulpir taluka increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.