वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७६.१९ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:07 PM2018-05-30T14:07:51+5:302018-05-30T14:07:51+5:30

वाशिम : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४  शेतकऱ्यांपैकी १ लाख १४ हजार ६३३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. संबंधित पात्र शेतकऱ्यांना ७६ कोटी १९ लाख २७ हजार ५४२ रुपये एवढी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

Crop insurance of Rs 76.19 crore approved for farmers of Washim district! | वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७६.१९ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर!

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७६.१९ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर!

Next
ठळक मुद्देकारंजा व मानोरा तालुक्यातील   शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाल्याचे टक्केवारीवरून दिसून येते.ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मंजूर झालेल्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  ११ टक्के विमा हप्त्याच्या ‘क्यापिंग’ची अट रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

वाशिम : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४  शेतकऱ्यांपैकी १ लाख १४ हजार ६३३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. संबंधित पात्र शेतकऱ्यांना ७६ कोटी १९ लाख २७ हजार ५४२ रुपये एवढी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. सरासरीच्या तुलनेत कारंजा व मानोरा तालुक्यातील   शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाल्याचे टक्केवारीवरून दिसून येते. दरम्यान, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मंजूर झालेल्या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 
यापूर्वी पीक विमा योजनेत नुकसान आणि मिळणाऱ्या भरपाईत फार मोठी तफावत होती. त्यातील सर्व त्रृटी आणि अडथळे शासनस्तरावरून दुर करण्यात आले. ११ टक्के विमा हप्त्याच्या ‘क्यापिंग’ची अट रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पुर्वी मंडळ स्तरावर संपूर्ण शेतीचे नुकसान झाले असेल तरच शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती. आता मात्र वैयक्तीक स्तरावरही पिकांचे नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळणार आहे. शासनस्तरावरून बदलण्यात आलेल्या या धोरणाप्रती शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

Web Title: Crop insurance of Rs 76.19 crore approved for farmers of Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.