मुख्यमंत्री ग्रामसडक योजना :  वाशिम जिल्ह्यातील १३ गावांमधील रस्ते चकाकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:12 PM2018-02-08T16:12:52+5:302018-02-08T16:15:57+5:30

वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून ९८.३२ किलोमिटरच्या या रस्त्यांवर ६० कोटी १२ लक्ष ६६ हजार रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी ८ फेब्रुवारीला दिली.

Chief Minister Gram Sadak Yojna: 13 villages in Washim district will glide! | मुख्यमंत्री ग्रामसडक योजना :  वाशिम जिल्ह्यातील १३ गावांमधील रस्ते चकाकणार!

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना :  वाशिम जिल्ह्यातील १३ गावांमधील रस्ते चकाकणार!

Next
ठळक मुद्दे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. रस्त्यांसाठी लागणारी जमीन खासगी मालकीची असल्यास अथवा वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्यास संबंधित रस्त्याचे काम हाती घेवू नये, असे आदेश ग्रामविकास विभागाने ७ फेब्रुवारीला दिले आहेत. सदर रस्ते दर्जोन्नतीच्या कामांना सन २०१७-१८ च्या अद्ययावत दरसुचीनुसार तांत्रिक मंजूरी द्यावी, असेही ग्रामविकास विभागाने कळविले आहे. 


वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून ९८.३२ किलोमिटरच्या या रस्त्यांवर ६० कोटी १२ लक्ष ६६ हजार रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी ८ फेब्रुवारीला दिली.
वाशिम तालुक्यातील गणेशपूर-देवठाणा, देवठाणा-तोंडगाव, किनखेडा-भोयता, मंगरूळपीर तालुक्यातील कळंबा रस्ता, वाकी-वाघोडा, कारंजा तालुक्यातील धोत्रा-मेहा, भडशिवणी-अंतरखेड, मानोरा तालुक्यातील जामदरा, गिरोली-खेर्डा, रिसोड तालुक्यातील पिंपरखेड, चांडस-नावली, जवळा-चिचांबा आणि मानोरा तालुक्यातील प्रजिमा १९ ते आमदरी या रस्त्याच्या दर्जोन्नतीची प्रक्रिया यामाध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणेने ई-टेंडरिंग करूनच कार्यारंभ आदेश द्यावे, रस्त्यांसाठी लागणारी जमीन खासगी मालकीची असल्यास अथवा वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्यास संबंधित रस्त्याचे काम हाती घेवू नये, असे आदेश ग्रामविकास विभागाने ७ फेब्रुवारीला दिले आहेत. सदर रस्ते दर्जोन्नतीच्या कामांना सन २०१७-१८ च्या अद्ययावत दरसुचीनुसार तांत्रिक मंजूरी द्यावी, असेही ग्रामविकास विभागाने कळविले आहे. 

Web Title: Chief Minister Gram Sadak Yojna: 13 villages in Washim district will glide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.