पावसामुळे पुल वाहून गेला; शिरपूर - वाशिम मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 12:24 PM2021-08-19T12:24:16+5:302021-08-19T12:24:31+5:30

The bridge was swept away by the rain : शिरपूर ते वाशिम मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.

The bridge was swept away by the rain; Shirpur - Washim road closed | पावसामुळे पुल वाहून गेला; शिरपूर - वाशिम मार्ग बंद

पावसामुळे पुल वाहून गेला; शिरपूर - वाशिम मार्ग बंद

Next

वाशिम : शिरपूर जैन येथून वाशिमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पावसामुळे  वाहून गेल्याने शिरपूर ते वाशिम मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामुळे ब्राह्मणवाडा परिसरातील शेतकरी सुद्धा अडचणीत आले आहेत. 
जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शिरपुर ते वाशिम रस्त्यावरील ब्राह्मणवाडा येथील नाल्यावरील पूलाचा एक भाग वाहून गेला. तेव्हापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. मात्र काही प्रमाणात पुलाचा भाग कायम असल्याने दुचाकी वाहतूक सुरू होती. या धोकादायक पुलावरून शेकडो शासकीय कर्मचारी, व्यापारी, शालेय विद्यार्थी व नागरिक दुचाकीने शिरपूर -वाशिम -शिरपुर असा प्रवास करीत असत. तरी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे  दुर्लक्ष केले. त्यातच मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवार १९ ऑगस्ट रोजी पूलाचा उरलासुरला भागही पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे शिरपूर - वाशीम रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. या पुलाच्या दुरुस्त सह परिसरातील इतरही पूल पावसामुळे खचुन गेले आहेत.या विषयी २२ जुलै रोजी बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला मुठठा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश चांडे यांनी निवेदन दिले होते. मात्र याकडे अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. ब्राह्मणवाडा येथील वाहून गेलेल्या पुलामुळे ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाणेही अवघड झाले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिक  आंदोलन करणार असल्याची माहिती निलेश चांडे यांनी दिली आहे.

Web Title: The bridge was swept away by the rain; Shirpur - Washim road closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.