गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:38 PM2018-02-18T14:38:57+5:302018-02-18T14:41:39+5:30

वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे  शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे.

Annual planning of farmers in Washim collapsed due to hailstorm! | गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन कोलमडले!

गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन कोलमडले!

googlenewsNext
ठळक मुद्दे११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. नुकसानाचा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित गावांचे पंचनामे सद्या केले जात आहेत.


वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे  शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सद्या सुरू असून अर्धीअधिक महसूल यंत्रणा शेतशिवारांमध्ये दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाल्यासह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच विविध संकटांनी खचलेला जिल्ह्यातील शेतकरी अधिकच हतबल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे आगामी खरिप हंगामात कराव्या लागणाºया खर्चाचे नियोजन पुरते कोलमडल्याचा सूर नुकसानग्रस्त शेतकºयांमधून उमटत आहे. 
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित गावांचे पंचनामे सद्या केले जात आहेत. महसूल विभागाची अर्धिअधिक यंत्रणा याकामी गुंतली असून पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Annual planning of farmers in Washim collapsed due to hailstorm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.