जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट; शिरपूर मधे तणाव, जमावकडून बस स्थानक परिसरात तोडफोड

By नंदकिशोर नारे | Published: January 14, 2023 10:29 PM2023-01-14T22:29:54+5:302023-01-14T22:30:37+5:30

Washim: मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे १४ जानेवारी रोजी एका विशिष्ट समाजाला उद्देशून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केल्याने जमावाने चिडून जाऊन बस स्थानक परिसरात प्रचंड तोड फोड करून गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला.

A post inciting communal tension; Tension in Shirpur, vandalism in bus station area by mob | जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट; शिरपूर मधे तणाव, जमावकडून बस स्थानक परिसरात तोडफोड

जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट; शिरपूर मधे तणाव, जमावकडून बस स्थानक परिसरात तोडफोड

Next

- नंदकिशोर नारे

वाशीम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे १४ जानेवारी रोजी एका विशिष्ट समाजाला उद्देशून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केल्याने जमावाने चिडून जाऊन बस स्थानक परिसरात प्रचंड तोड फोड करून गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला. परिणामी गावात तणाव निर्माण झाल्याने संचारबंदी सदृश्य परिस्थिती  १४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता निर्माण झाली. सध्या परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी लोकमतला दिली. 

एका विशिष्ट समाजाला उद्देशून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केली. परिणामी संबंधित समाजाचे लोक सोशल मीडियावर स्टेस्ट्स ठेवणारावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी न ठाणेदाराकडे गेले असता ठाणेदाराने लेखी तक्रार लिहून घेतली नाही. त्यामुळे जमावाने चिडून जाऊन बस स्थानक परिसरात प्रचंड तोड फोड करून गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित केला. जमावाला शांत करण्यास ठाणेदार अपयशी ठरले. शहारातील स्ट्रीट लाईट फोडून सर्वत्र अंधार झालेला आहे. या अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटकानी दगडफेक करून वातावरण दूषित केले. अशी माहिती पोलिस अधीक्षक यांना कळतच त्यांनी वाशिम येथून अतिरिक्त पोलीस कुमक शिरपूर येथे पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली.  रात्री १० वाजेपर्यत गावात तणावपूर्ण वातावरण दिसून आले . परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याची  माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी दिली.

Web Title: A post inciting communal tension; Tension in Shirpur, vandalism in bus station area by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.