टँकर पाजतात डबक्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:40 PM2017-07-26T23:40:21+5:302017-07-26T23:40:31+5:30

विरार परिसरात पाण्याची टंचाई असल्याचा गैरफायदा टँकर लॉबीने वेगळ््या पद्धतीने उचलण्यास सुरुवात केली आहे. झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी टँकरवाले पिण्याचे पाणी म्हणून डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा

water prablem in Vasai-virar | टँकर पाजतात डबक्याचे पाणी

टँकर पाजतात डबक्याचे पाणी

Next

शशी करपे 
वसई : विरार परिसरात पाण्याची टंचाई असल्याचा गैरफायदा टँकर लॉबीने वेगळ््या पद्धतीने उचलण्यास सुरुवात केली आहे. झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी टँकरवाले पिण्याचे पाणी म्हणून डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा करीत असल्याचे लोकमतच्या निदर्शनास आले आहे.
गोखीवरे परिसरात मधुबन नावाची वसाहत आहे. त्याठिकाणी पावसाळी पाणी साचलेले मोठे डबके आहे. त्या डबक्यात पाण्याचे पाच पंप बसवण्यात आले आहेत. त्या पंपाद्वारे टँकरमध्ये डबक्यातील पाणी भरले जाते. त्यानंतर पिण्याचे पाणी असल्याचे सांगून टँकरवाले शहरातील इमारती आणि चाळींमध्ये हेच पाणी विकतांना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी टँकरने पाणी उपसा केला जात आहे. दिवस-रात्री टँकर याठिकाणी पाणी भरत आहेत. लोकमतची टीम फोटोग्राफर हनिफ पटेल यांच्यासह याठिकाणी गेली असता अवघ्या अर्ध्या तासात किमान वीस-पंचवीस टँकर पाणी भरून निघून गेले. लोकमतच्या टीमने एका टँकरचा पाठलाग केला असता हा टँकर नालासोपारा येथील एका इमारतीच्या टाकीत पाणी ओततांना आढळला. चौकशी केली असता टंचाई असल्याने टँकरने पाणी मागवावे लागते असे उत्तर रहिवाशांनी दिले. तर तलावातील पाणी घेऊन आल्याचे चालकाने सांगितले. लोकांच्या जीवाशी खेळणाºया टँकर लॉबीवर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे आता वसईकरांचे लक्ष लागले आहे.


धक्कादायक बाब म्हणजे डबक्यातील पाणी आणणाºया दहा हजार लिटर क्षमतेच्या असलेल्या एका टँकरसाठी दर एक ते दीड हजार रुपये आकारले जात आहे. ज्या सोसायटया नियमितपणे पाणी घेणाºयांसाठी एक हजार रुपये आणि कधीतरी पाणी घेणाºयांसाठी दीड हजार रुपये दर आकारले जातात असेही टँकर चालकाने सांगितले. या पाण्याची कोणतीही तपासणी कुणीही करीत नाही.

Web Title: water prablem in Vasai-virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.