वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:12 AM2018-06-15T04:12:11+5:302018-06-15T04:12:11+5:30

दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

Vasai's school did not make it, board corruption, wrong information on website | वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती

वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती

Next

पारोळ - दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील मुलांना बार्डाने चक्क एटीकेटी लावल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या निकालात वसई तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याचे दिसून येत असताना जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेचा निकाल मात्र बोर्डाच्या चुकी मुळे ० टक्के लागल्याचे जाहीर झाल्याने पालकांना आणि शाळा व्यवस्थापनेला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. या शाळेतील ४१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते ते सर्व नापास असल्याचे दाखिवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. ८२ टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे नापास दाखिवण्यात आला होता. मुळात शाळेत जो विषय शिकविला जात नाही त्या विषया बाबत हा घोळ झाल्याचे समोर आले आहे.
या बाबत शाळा व्यवस्थापनाने परीक्षे पूर्वीच बोर्डाला पत्र लिहून कळविले होते. तसेच ही चूक दुरुस्त करण्यासाठी शुल्क ही भरले असताना बोर्डाच्या गलथान कारभारामुळे येथील मुलांना त्यांच्या पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला नाहक त्रास सहन करावा लागला. मुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असा रिझल्ट देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्क लिस्टवर प्रमोटेड असे दाखविण्यात आले आहे. तसेच काहींना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एटीकेटी लावल्याने शिक्षण क्षेत्रातील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र, या बाबत तात्काळ खुलासा झाला नाही.
शाळेतील परीक्षा दिलेल्या ४१ विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकला नाही. शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. ८२ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी शाळेचा टॉपर आहे. केवळ ग्रेड सब्जेक्ट म्हणून असलेल्या शाळेच्या वर्कएज्युकेशन विषयाचे गुण न दिल्याने व तसे बोर्डाला कळवले असतांनाही निकाल बोर्डाच्या साईडवर शुन्य टक्के दिल्याने बोर्डाचा गलथानपणा दिसून येत आहे.

बोर्डाच्या लेखी तांत्रिक चूका

मुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असे निकालपत्र देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर प्रमोटेड असे दाखिवण्यात आले आहे
या बाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र त्यामुळे अनेकांना त्रास झाला.

बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे आमच्या शाळेची बदनामी झाली असून त्याचा फटका आमच्या रेप्युटेशनला बसला आहे. आम्ही सर्व बाबीची पूर्तता केली असतानाही बोर्डाने त्या कडे लक्ष न दिल्याने शुन्य टक्के निकाल दिला आहे. आमची सर्व मुले पास असतानाही त्यांना नापास दाखविण्यात आल्याने आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. -जनार्दन म्हात्रे,
संस्थापक अध्यक्ष गिरीजा म्हात्रे विद्यालय)

Web Title: Vasai's school did not make it, board corruption, wrong information on website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.