वसईत उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना

By admin | Published: May 28, 2017 02:58 AM2017-05-28T02:58:25+5:302017-05-28T02:58:25+5:30

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करून तीन पिडीत महिलांसह एका अल्पवयीन मुलीची

Vasaiet Highway Living Room | वसईत उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना

वसईत उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करून तीन पिडीत महिलांसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी अ़नैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार महेश गोसावी, सुनीता कांटेला, शारदा गोर्डे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, प्रशांत देसाई, अर्चना कोळी यांची एक टीम तयार केली. तिने बोगस गिऱ्हाईक पाठवून सापळा रचला.
यावेळी एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांनी या बोगस गिऱ्हाईकांसमोर तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलीला आणले. त्यानंतर पथकाने धाड टाकली. यावेळी पोलिसांनी तीनही आरोपी महिलांना अटक केली. तसेच तीन पिडीत महिला आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली.
या तीन आरोपी पिडित महिला आणि अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी तीन महिलांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.
दरम्यान, माणिकपूर शहरात याआधी दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना आनंद नगर येथील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून कुंटणखाना चालवत असलेल्या एक महिलेसह पुरुषाला अटक केली होती.
यावेळी चार पिडीत महिलांची सुटका करण्यात आली होती. तर माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई रोड रेल्वे परिसर आणि नवघर एसटी स्टँड परिसरात अनेक वेश्या खुलेआम फिरून गिऱ्हाईके शोधून शहरातील लॉजेसमध्ये अनैतिक व्यवसाय करीत आहेत.
याप्रकरणी आनंद नगर परिसरातील शंभरहून अधिक सोसायट्यांनी तक्रार केली आहे. तसेच महिलांनी आंदोलन करून पोलिसांचे याकडे लक्षही वेधले आहे. त्यानंतरही खुलेआम फिरणाऱ्या वारांगणांवर कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येतो.

Web Title: Vasaiet Highway Living Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.