वसई : महिलेला अश्लील मेसेज पाठवणा-या गायकाला महिलांनी भररस्त्यात दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:11 AM2018-01-25T01:11:26+5:302018-01-25T01:12:28+5:30

सामाजिक कार्यकर्ता असलेल्या एका महिलेच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून भेटायला बोलावणा-या एका गायकाला महिलांनी भररस्त्यात चांगलाच चोप देऊन तुळींज पोलिसांच्या हवाली केले.

Vasai: The women who sent the porn message to the woman gave her a fillip | वसई : महिलेला अश्लील मेसेज पाठवणा-या गायकाला महिलांनी भररस्त्यात दिला चोप

वसई : महिलेला अश्लील मेसेज पाठवणा-या गायकाला महिलांनी भररस्त्यात दिला चोप

Next

वसई : सामाजिक कार्यकर्ता असलेल्या एका महिलेच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून भेटायला बोलावणा-या एका कथित भोजपुरी गायकाला महिलांनी भररस्त्यात चांगलाच चोप देऊन तुळींज पोलिसांच्या हवाली केले.
पीडित महिलेची ओळख असलेल्या भोजपुरी गायक पिंटू सिंग याने त्याचा शाळा प्रवेशाचे काम असल्याचे कारण सांगून मोबाईल नंबर घेतला होता. मात्र, गे्ल्या दहा-बारा दिवसांपासून तो रात्री-अपरात्री त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर मॅसेज पाठवून सतावत होता. महिलेने कामासाठी त्याच्याशी व्हॉटसअ‍ॅपवर बोलणे केल्यानंतर त्याने अश्लील गाणी, फोटो, मॅसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच तो त्यांना भेटण्यासाठी बोलावू लागला.
या प्रकाराने हैराण झालेल्या या महिलेने काही महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बुधवारी त्याला दुपारी भेटायची वेळ दिली. ओसवाल नगरी येथे भेट झाल्यावर तो त्यांना हॉटेलमध्ये येण्याचा आग्रह करू लागला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यासरशी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर त्याला तुळींज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
आरोपी विकृत्त प्रवृत्तीचा असून एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
व्हॉटसअ‍ॅपवर अश्लील मॅसेज पाठवून मानसिक त्रास देणाºया आणि छेडछाड करणा-या विकृतांना धडा शिकवला तर असे प्रकार घडणार नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होणार नाही, असे पीडित महिलेने सांगितले.

Web Title: Vasai: The women who sent the porn message to the woman gave her a fillip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.