वसई, नालासोपारात शहर एसटी बंद, महामंडळ, महापालिकेत वाद : परिवहन सेवा गैरसोयीची; पुन्हा आंदोलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:02 AM2017-11-15T01:02:57+5:302017-11-15T01:03:16+5:30

एसटी महामंडळाने वसई आणि नालासोपा-यातील शहरी बससेवा सोमवारपासून बंद केली आहे. ६ डिसेंबरपर्यंत एसटी या परिसरातील शहरी बस सेवा पूर्णपणे बंद करणार आहे.

 Vasai, Nalasoparpar city ST buses, corporations, municipal corporation: transportation service inconvenient; Again the preparations for the agitation | वसई, नालासोपारात शहर एसटी बंद, महामंडळ, महापालिकेत वाद : परिवहन सेवा गैरसोयीची; पुन्हा आंदोलनाची तयारी

वसई, नालासोपारात शहर एसटी बंद, महामंडळ, महापालिकेत वाद : परिवहन सेवा गैरसोयीची; पुन्हा आंदोलनाची तयारी

googlenewsNext

वसई : एसटी महामंडळाने वसई आणि नालासोपा-यातील शहरी बससेवा सोमवारपासून बंद केली आहे. ६ डिसेंबरपर्यंत एसटी या परिसरातील शहरी बस सेवा पूर्णपणे बंद करणार आहे. वसई विरार महापालिकेने शहरी मार्गावर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी शेड्युलच्या घोळाने वसईत संघर्ष निर्माण होऊन पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
जनता आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन एसटी आणि वसई विरार महापालिकेने शहरी बससेवा चालवण्याचा निर्णय घ्यावा असे निर्देश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात दाखल झालेली याचिका निकाली काढल्यानंतर एसटी आणि महापालिकेने नवा घोळ घालून संघर्षाला खतपाणी घातले आहे. एसटीने शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यास सुरुवात केली असून येत्या ६ डिसेंबरपर्यंत शहरी बससेवा पूर्णपणे बंद केली जाणार आहे. दुसरीकडे, वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने एसटीने बंद केलेल्या मार्गावर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एसटी आणि महापालिकेच्या शेड्यूलमधील प्रचंड फरकाने लोकांच्या असंतोषात भर घातली आहे.
एसटीची सेवा विरारहून सुटणाºया पहाटेच्या पहिल्या लोकलपासून ते मुंबईहून येणाºया शेवटच्या लोकलपर्यंत सुुरु असायची. तसेच दर पंधरा मिनिटांनी बसेस सोडल्या जात असत. याउलट महापालिकेची सेवा सकाळी उशिराने सुरु होऊ़न रात्री लवकर बंद होणार आहे. शिवाय बसेसही दर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने सुटणार असल्याने भाजीपाला विक्रेता, फुल विक्रेता, दूध विक्रेता आणि पहाटे पहिल्या शिफ्टमध्ये कामावर जाणाºयांचे प्रचंड हाल होणार आहेत. म्हणूनच पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे.
या निर्णयानंतर वसईतील गावागावात एसटी बचावचा नारा पुन्हा घुमू लागला आहे. एसटी बचाव समिती आणि जनआंदोलन समितीने सोमवारपासून गावागावात सभा घेऊ़न लोकांना जागृत करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटीसाठी वसईत पुन्हा आंदोलन सुरु होणार आहे.

Web Title:  Vasai, Nalasoparpar city ST buses, corporations, municipal corporation: transportation service inconvenient; Again the preparations for the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.