केवळ वसई-विरारमध्ये यंदाही १५० शाळा आहेत अनधिकृत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:57 PM2019-05-27T23:57:36+5:302019-05-27T23:57:39+5:30

पालघर जिल्हा परिषदेने वसई विरारमधील १५० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.

 There are only 150 schools in Vasai-Virar this year | केवळ वसई-विरारमध्ये यंदाही १५० शाळा आहेत अनधिकृत

केवळ वसई-विरारमध्ये यंदाही १५० शाळा आहेत अनधिकृत

Next

नालासोपारा : पालघर जिल्हा परिषदेने वसई विरारमधील १५० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यात १९० शाळा अनिधकृत आहेत, तर एकट्या वसई-विरारमध्ये १५० शाळा अनिधकृत आहेत. जिल्ह्यात इतक्या मोठ्या पटीने नियमबाह्य शाळांची निर्मीती होत असतांना शिक्षण विभाग तसेच स्थानिक पातळीवरील प्रशासन काय झोपा काढत आहे का? असा संतापजनक सवाल नागरिकांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यापेक्षा एकट्या वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात जे बेकायदा शाळांचे पिक आले आहे. अवैध शाळा ह्या केवळ गल्ला भरणे हे एकमात्र निमीत्त ठेवून स्थापन करण्यात आल्या आहेत. कारण अवैध शाळांत शिक्षणाबरोबरच शालेय साहित्यदेखील शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर असते. शाळेतील संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण लयास जात असताना अवैध शाळांच्या बाबतीत शासन इतके गाफील कसे राहू शकते.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनिधकृत शाळांचा आकडा डोळ्यात अंजन घालणारा आहे. या दिडशे शाळांत किती हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतील आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्याचे काय? याचा गंभीर विचार पालिका आयुक्त बळीराम पवार
यांनी करावा. अनिधकृत शाळांच्या बांधकामांकडे पाठ करण्याचे पाप पालिका प्रशासन करत असेल तर शिक्षण विभागानेदेखील आपल्या जबाबदारी टाळण्याचे पाप करू नये गतवर्षी देखील या शाळा अस्तित्वात होत्या. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आपला शिक्षण विभाग या शाळांना दंड ठोठावण्याची कारवाई करेल, त्यांच्या प्रवेशद्वारे त्या अनधिकृत असल्याचा फ्लेक्स लावेल अशी गर्जना गतवर्षी केली परंतु नंतर वसूल केलेला दंड कोणत्या खात्यात भरायचा याची तरतूद नियमात नाही. असा शेपूट घालू पवित्रा घेऊन स्वत:ची आपल्याच शब्दातून मुक्तता करून घेतली होती.
>दरवर्षी जि.प. उरकते यादी जाहीर करण्याचे आन्हिक
पालघर जिल्ह्यात १९० शाळा अनधिकृत असून या शाळांची यादीच पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांना मान्यता नसतानादेखील त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ मांडत आहेत. महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील १५० शाळांवर कारवाई करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा जून महिन्यात या शाळेत प्रवेश घेऊन विद्यार्थी स्वत:चे नुकसान करून घेतील. जिल्हा परिषदेने या १९० शाळांमध्ये विद्यर्ा्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे जाहीर आवाहनच केले आहे.
ही यादी जिल्ह्याने काढली असून ते प्रथम नोटीस देऊन कारवाई करणार व नंतर मी नोटिसा देऊन कारवाई करणार या शाळांना आधी नोटिसा पाठविल्या असून पाल्यांनी आपल्या मुलामुलींना या शाळेत घालू नये. तसेच वसई विरार मधील अनिधकृत शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ही गंभीर समस्या आहे.
- सौ. तांडेल, प्रभारी, गटशिक्षण अधिकारी

Web Title:  There are only 150 schools in Vasai-Virar this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.