स्किमरद्वारे एटीएमकार्डची क्लोनिंग करणारी दुक्कल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:10 AM2018-04-27T03:10:30+5:302018-04-27T03:10:30+5:30

दोघेजण आगाशी बोळींज परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Skunker duplicate cloning ATM card | स्किमरद्वारे एटीएमकार्डची क्लोनिंग करणारी दुक्कल गजाआड

स्किमरद्वारे एटीएमकार्डची क्लोनिंग करणारी दुक्कल गजाआड

googlenewsNext


नंडोरे : बँकेच्या ग्राहकांची माहिती मिळवून बेकायदेशीर क्लोनिंग एटीएम कार्ड बनवून त्याद्वारे रक्कम काढणाऱ्या चंद्रगुप्त छोटेलाल मौर्य (२७) व तिमिर जितेंद्र मारू (२७) रा. ग्लोबल सिटी विरार (पश्चिम) यांना अर्नाळा पोलिसांनी मंगळवारी ओलांडा नाक्यानजीक मंगळवारी अटक केली. त्यांना बुधवारी वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
दोघेजण आगाशी बोळींज परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गस्तीदरम्यान सापळा रचला. हे दोघेही ओलांडा परिसरात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता स.पो.नि राकेश पगारे, स.पो.फौ. प्रभाकर पवार, दिगंबर सांगळे व त्यांच्या सहकार्यांनी त्यांना अटक केली. या दरम्यान त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून पोलिसांना एटीएमसदृश्य कार्ड सापडले आहेत. अधिक माहिती घेतली असता ते दोघे एकाच ठिकाणी कामाला असल्याचे समजले. तसेच ते कामच्या ठिकाणी येणाºया ग्राहकांची माहिती त्यांच्याकडे असलेल्या स्किमरद्वारे (माहिती गोळा करणारे यंत्र) ते बेकायदेशीर चोरी करत असत. त्या द्वारे त्यांच्याकडे असलेल्या ग्राहकांच्या माहितीच्या आधारे ते बनावट व क्लोन केलेले एटीएम बनवीत व त्यामार्फत बँकेच्या एटीएममधून ग्राहकाच्या नावाने पैसे काढत असल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी या दोन्ही आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्यांना बनावट एटीएम कार्ड बनविण्याचे यंत्र (स्किमर), रायटर व लॅपटॉप जप्त केले आहे. या दोघांविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघांनाही बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डी. वाय. एस. पी. जयंत बजबळे करीत आहेत.

Web Title: Skunker duplicate cloning ATM card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.