खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, मागण्यांसाठी डहाणू तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:00 AM2017-10-11T02:00:17+5:302017-10-11T02:00:48+5:30

 Seriously punish the murderers, Marxists' rivalry on Dahanu tehsils for demands | खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, मागण्यांसाठी डहाणू तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा

खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, मागण्यांसाठी डहाणू तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा

Next

शौकत शेख
डहाणू : जेष्ठ पत्रकार यांच्या गौरी लंकेश, एम.एम.कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करून खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, गुरचरण, देवस्थान ट्रस्ट जमिनी, जमिनदारांच्या खाजगी जमीनी कसणा-यांच्या नावे करा, ७/१२वर पिकपाण्याची नोंद करा, कवडास व धामणी या धरणांचे पाणी डहाणूच्या पश्चिम बंदरपट्टी बोर्डी पर्यंत द्या.मुंबई-मीरा-भार्इंदर व वसई-विरारकडे सूर्या प्रकल्पाचे ८० टक्के पाणी वळविणारी योजना त्वरीत रद्द करा, शेतकरी- शेतमजूर, आदिवासी, अल्पभूधारक यांच्या विकासासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारतींची अंमलबजावणी करा. शेतकºयांचे कर्ज सरसकट माफ करा. वनाधिकार कायद्याची आणि जंगलावरील आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करा. अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसीलवर सीपीएमने तालुका अध्यक्ष एडवर्ट वरठा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.
तहसिलदार राहुल सारंग यांना निवेदन देण्यात आले. ते सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला. तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा, लहानी दौडा, विनोद निकोले, चंद्रकांत गोरखाना, रामदास सुतार, चंदू कोम यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
पेसा कायद्याची अंमलबजावणी काटेकोर करा, अन्न, वस्त्र, निवारा मूलभूत गरजा पूर्ण करा, रेशनचे सार्वजनिकरण करा, अन्न-धान्य, रॉकेल, साखर डाळी तसेच अन्य अत्यावश्यक वस्तूंचा रेशनवरील कोटा वाढवून द्या, महिला व मुलांच्या कुपोषणाचे उच्चाटन करा, ग्रामीण जनतेला आणि शेतकºयांना उध्वस्त करणारे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रेल्वे मार्ग, मुंबई-दिल्ली रेल्वे कॉरिडोर रेल्वे मार्ग, एक्सप्रेस हायवे इ.रद्द करा, आदि मागण्या करण्यात आल्या.

Web Title:  Seriously punish the murderers, Marxists' rivalry on Dahanu tehsils for demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.