वीस लाख वसईकरांची सुरक्षा तोकडी

By admin | Published: January 14, 2017 06:11 AM2017-01-14T06:11:43+5:302017-01-14T06:11:43+5:30

सात पोलीस ठाणी, एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या वसई तालुक्यात गेल्या वर्षी जबरी चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण

Security of 20 lakh Vasikekar | वीस लाख वसईकरांची सुरक्षा तोकडी

वीस लाख वसईकरांची सुरक्षा तोकडी

Next

शशी करपे / वसई
सात पोलीस ठाणी, एक उपअधिक्षक आणि एक अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या वसई तालुक्यात गेल्या वर्षी जबरी चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले दिसले. त्यामानाने या वर्षी गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे चित्र आहे. अपुरे पोलीस बळ असल्याने गुन्हे रोखणे आणि सोडवण्यात वेळ लागत असल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखावर चिंंता व्यक्त करण्यात येत आहे.
वसई तालुक्याची लोकसंख्या वीस लाखाच्या घरात पोचली आहे. वसईतील गुन्हेगारी रोखण्यासाठी वसई, विरार, अर्नाळा सागरी, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपूर आणि वसई अशी सात पोलीस ठाणी आहेत. तर एक अप्पर पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपअधिक्षक कार्यरत आहेत. असे असले तरी वसई तालुक्यात गेल्या वर्षभरात गुन्हयांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विनयभंग आणि बलात्कारांच्या वाढत्या घटनांनी चिंंता व्यक्त होत असताना आता जबरी चोऱ्या आणि घरफोड्यांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. पोलीस बळ अपुरे असल्याने गुन्हेगारी टोळयांचा फायदा होत असल्याचे पोलीस अधिकारी खाजगीत बोलताना सांगतात.
वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ घरफोड्या झाल्या असून ४६ चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यातील ६ चोरीची प्रकरणे आणि ५ घरफोड्यांची उघडकीस आणली आहेत. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ३ दरोड्यांचा पोलीसांनी माग काढला आहे. ९३ घरफोडीच्या घटनांपैकी केवळ ७ घरफोड्यांचा तपास पोलीसांनी पूर्ण केला आहे. तर ४६ चोरीच्या प्रकरणांपैकी १६ चोरीची प्रकरणे धसास लावली आहेत. दरम्यान, पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने पोलिसांवर कामाचा प्रचंय्ऋ ताण आहे. दैनंदिन कामकाजांसह कोर्ट, गस्त, मोर्चे यासह विविध कामांचा पोलिसांवर बोजा आहे.

Web Title: Security of 20 lakh Vasikekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.