सॅटेलाइट सर्व्हे शेतीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:00 AM2018-10-19T00:00:00+5:302018-10-19T00:01:11+5:30

मोखाडा, वाडा नुकसानग्रस्त तालुके : भात, नागली, वरई गेली करपून, बळीराजा पुन्हा संकटात

Satellite Survey on Agriculture | सॅटेलाइट सर्व्हे शेतीच्या मुळावर

सॅटेलाइट सर्व्हे शेतीच्या मुळावर

Next

मोखाडा : शासनाने सॅटेलाईटद्वारे केलेल्या सर्वेक्षणात पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मोखाडा हे नुकसान ग्रस्त तालुके वगळल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने शेतकरी पुरते हताश झाले आहेत. सप्टेंबर महिन्यातील कडक ऊन्हामुळे जिल्हयातील तालुक्यांमध्ये बहुतांश पिक करपुन गेले, भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव झाला आहे.
वाढत्या तापमानात भातावरील विविध रोगाचा प्रसार वाढला व येणं भात पीक तयार होण्याची प्रक्रि या सुरू असताना दीड ते दोन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने आवश्यक पाणी शेतीला मिळाला नाही. त्यामुळे भाताच्या उत्पादनात मोठी घट होणार असून शेतकºयांच्या हाती ५० टक्क्यांपेक्षाही कमी पिक लागणार आहे. अनेक भागात पिक करपल्याने पिकाऐवजी गवताची पेंढी हाती येण्याची स्थिती असून वाड्या सारख्या भातशेतीला पूरक आणि वाडा कोलम सारख्या भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील शेतकरी पावसाने पाठ फिरविल्याने करपलेल्या शेतीला आगी लावून संताप व्यक्त करीत आहेत. वर्षभर शेतात राबराब राबून पिकविलेले पीक करपून गेल्याने शेतकºयांनी ते पेटवून देण्याचे प्रकार वाढत चालले असून शेतकºयांच्या संतापाचा उद्रेक वाढू लागला असताना करपलेले भात, पाण्या अभावी जमिनीला पडलेल्या भेगा येथील दुष्काळच भयाण वास्तव दर्शवित आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व च पालकमंत्र्यांना गावा-गावांत जाऊन पिकांची स्थिती पाहुन दुष्काळी स्थिती चे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यापैकी १७२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार ट्रिगर २ नुसार पालघर, विक्र मगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित करण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्ष पिक पहाणी तलाठ्यांनी करण्यापूर्वीच शासनाने हा अंदाज बांधला आहे.


यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची रोवणी करण्यात आली परंतु येथील वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती सध्या धोक्यात आले आहे. यामुळे दरवर्षीच निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांना साथ देत नसल्याने व त्याचबरोबर शेतीच्या अश्या अवस्थेमुळे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज फेडायची कशी यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.


अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची का नाही असा प्रश्न पुढे येऊन ठाकला असताना सरकारने आणखी शेतकºयाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले याबाबत अधिक माहितीसाठी नायब तहसीलदार पी. जी. कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

शासनाने आणेवारी धोरण बदलावे
जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसावर अवलंबून आहे. दीड महिना पाऊस न पडल्याने सर्वच तालुक्यातील पिकांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षाही खाली येणार हे स्पष्ट असल्याने संपूर्ण पालघर जिल्हा दुष्काळाच्या यादीत आहे.
शासनाच्या धोरणानूसार ५० टक्यांपेक्षा कमी आणेवारी आल्यानंतरच दुष्काळ जाहीर केला जातो. परंतु या वर्षी सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे शेतकºयांच्या मुळावर उठला आहे. निसर्गावर अवलंबुन असलेल्या शेतांमध्ये दुष्परिणाम दिसू लागल आहेत.

Web Title: Satellite Survey on Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी