लाच प्रकरणामुळे महसूल अधिकारी गोत्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:11 AM2018-01-10T02:11:46+5:302018-01-10T02:11:49+5:30

कामण येथील तलाठ्याला २४ हजार रुपयांची लाच घेताना त्याच्या खाजगी सहाय्यकासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

Revenue officials will come to Goa in connection with a bribe case | लाच प्रकरणामुळे महसूल अधिकारी गोत्यात येणार

लाच प्रकरणामुळे महसूल अधिकारी गोत्यात येणार

googlenewsNext

वसई : कामण येथील तलाठ्याला २४ हजार रुपयांची लाच घेताना त्याच्या खाजगी सहाय्यकासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
गणेश पाटील असे तलाठ्याचे नाव असून त्याने तक्रारदाराकडून सातबारा उताºयावर मालकी हक्क नोंदणी करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. आज सकाळी त्यातील २४ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना तलाठी पाटील याला त्याच्या खाजगी सहाय्यकासह रंगेहाथ अटक करण्यात आली. सदर रकमेतील वाटा वरिष्ठांना द्यावा लागतो असे तलाठ्याने तक्रारदाराला सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणीत महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी माणिकपूर तलाठी कार्यालयात सरकारी कागदपत्रांची हाताळणी करताना एका खाजगी महिलेला पकडले होते. खाजगी सहाय्यक ठेऊ नयेत असे जिल्हाधिकाºयांचेआदेश आहेत. मात्र, दोन्ही प्रकरणात खाजगी व्यक्ती तलाठी कार्यालयात कार्यरत असल्याचे उजेडात आले आहेत.

Web Title: Revenue officials will come to Goa in connection with a bribe case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.