महायुतीचे चित्र स्पष्ट, महाआघाडीची भूमिका अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:54 PM2019-03-15T22:54:54+5:302019-03-15T22:55:12+5:30

शिवसेना लागली कामाला; बविआ, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

The picture of the Mahavati is clear, the role of great ghadhadi is unclear | महायुतीचे चित्र स्पष्ट, महाआघाडीची भूमिका अस्पष्ट

महायुतीचे चित्र स्पष्ट, महाआघाडीची भूमिका अस्पष्ट

Next

- हुसेन मेमन 

जव्हार : पालघर लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय आखाडे रंगू लागले आहेत. विविध पक्षांमध्ये आयाराम गयारामांची नाटीका दररोजची असली तरी महायुतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र, आघाडी बाबत चर्चेचे गुºहाळ सुरुच असल्याने कायकर्ते संभ्रमात आहेत.

पालघर लोकसभा शिवसेना लढवणार यावरही शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकाना कामाला लागा चा आदेशही मातोश्रीवरु न देण्यात आलेला आहे. यामुळे लवकरच भाजपाचे राजीमाना अस्त्र म्यान होणार हे नक्की आहे. एकीकडे महायुतीची राजकीय भूमिका उमेदवार पक्ष स्पष्ट होत असतानाच दुसरीकडे मात्र महाआघाडीची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिकांनी खेडोपाडी प्रचार सुरु केला असून पोटनिवडणूकीतील बेरीज-वजाबाकी डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी व्यहरचना आखली आहे.

पालघर लोकसभा राजकीय दृष्टया तसा दुर्लक्षित मतदार संघ होता मात्र, भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकी पासुन याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. कारण राज्यस्तरावरच नव्हे तर देशपातळीवर या मतदार संघाची चर्चा झाली ती एवढी की, युतीची बोलणीही याच मतदारसंघावाचून आडली होती. हे सगळं पाहता आता युती होवून ही जागा शिवसेनेला सोडल्याचे तसेच सेनेकडून श्रीनिवास वणगाच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने पक्ष कोणता उमेदवार कोण हा निरोप शिवसैनिकांपर्यंत पोहचला आहे.

सीपीएम बविआला पाठींबा देवू शकेल का?
दुसरीकडे महाआघाडीची कसलीच भूमिका अजुन ठरत नसल्याने कार्यकर्ते सैरभर आहेत कारण कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकेल अशी परीस्थिती जिल्ह्यात अजिबात नाही. याठीकाणी युतीच्या उमेदवाराला टक्कर फक्त बहुजन विकास आघाडीचा उमेदवारच देवू शकतो मात्र, बविआ अपक्ष लढली व महाआघाडीत सीपीएम, कॉंग्रेस व राष्ट्रवादी मिळुन लढली तरीही मग महायुतीसाठी ही जागा सोपी होईल. मात्र, बविआ महाआघाडीत सामिल होवून बविआ आघाडीचे दोन्ही घटक आणि सीपीएम अशी महाआघाडी झाली तर मात्र युतीसाठी ही जागा कठीण होवू शकते.

यामुळे भाजपची पारंपारिक असलेली ही जागा सेनेला सोडल्यामुळे बविआ ताकदीने जागा लढु शकते या शिवाय राज्यात विनाअट भाजपाला पाठींबा देणाऱ्या बविआचा कसलाही विचार भाजपाने केला नाही यामुळे बविआ ही जागा लढून वचपा काढू शकते. मात्र, आता महाआघाडीत बविआ सामील होईल का ? कॉंग्रेस राष्ट्रवादी प्रमाणे सीपीएम बविआ ला पाठींबा देवू शकेल का? असे राजकीय पेच कायम आहेत.

Web Title: The picture of the Mahavati is clear, the role of great ghadhadi is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.