नऊ वर्षांनी आश्रमशाळा सुरु, प्रकल्प अधिकारी विद्यार्थ्यांसोबत नाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:57 AM2017-09-19T02:57:33+5:302017-09-19T03:01:09+5:30

गत नऊ वर्षा पासून बंद असलेली आश्रम शाळा सोमवारी सुरू झाल्याने मेंढवन येथे जल्लोषाचे वातावरण होते. गावक-यांनी तारपानाच करून या घटनेचे स्वागत केले. या पारंपारिक नृत्यामध्ये आदिवासी प्रकल्प अधिकारी अचल गोयल, सामाजिक कार्यकर्ते रहीम कुरेशी, ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष बिस्तुर कुवरा हे सहभागी झाले होते.

Nine years after the ashram school started, the project officer danced with the students | नऊ वर्षांनी आश्रमशाळा सुरु, प्रकल्प अधिकारी विद्यार्थ्यांसोबत नाचले

नऊ वर्षांनी आश्रमशाळा सुरु, प्रकल्प अधिकारी विद्यार्थ्यांसोबत नाचले

googlenewsNext

मनोर : गत नऊ वर्षा पासून बंद असलेली आश्रम शाळा सोमवारी सुरू झाल्याने मेंढवन येथे जल्लोषाचे वातावरण होते. गावक-यांनी तारपानाच करून या घटनेचे स्वागत केले. या पारंपारिक नृत्यामध्ये आदिवासी प्रकल्प अधिकारी अचल गोयल, सामाजिक कार्यकर्ते रहीम कुरेशी, ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष बिस्तुर कुवरा हे सहभागी झाले होते.
मेंढवन येथील आश्रमशाळा १९८० ला सुरू करण्यात आली होती. या शाळेचा परिसरातलील आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा आधार होता. दरम्यान, सदर आश्रमशाळा मोडकळीस आल्याने ती दुरुस्त करण्यापेक्षा काही राजकीय पुढारी व अधिकाºयांनी ती हलवून खुटल गावी स्थलांतर केली. मेंढवन गावकºयांसाठी हा भावनिक विषय होता. या प्रकरणी बिस्तुर कुरवा, रहीम सिद्दीकी व इतरांनी अमाप प्रयत्न केले परंतु त्यांना न्याय भेटला नाही त्यानंतर निवृत्त न्यायाधिश ओळहवे पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने बंद पडलेली आश्रम शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित खात्याला आदेश दिले होते.
>पातील प्रस्तावा
मेंढवन आश्रम शाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अचल गोयल यांचे हस्ते करण्यात आले. हा आनंद गावकºयांनी तारपा वाजून तसेच पारंपारिक नृत्य करुन साजरा केला. हा भावनिक विषय असल्याने या आनंदामध्ये प्रोटोकॉल बाजूला ठेवून प्रकल्प अधिकारी गोयल याही सहभागी झाल्या.

Web Title: Nine years after the ashram school started, the project officer danced with the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.