नैसर्गिक नाले संकटात; वसई पुन्हा बुडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:05 AM2019-03-14T01:05:55+5:302019-03-14T01:06:00+5:30

लाखो ब्रास मातीचे सपाटीकरण करून नैसर्गिक नाले बुजवले

Natural gutters in trouble; Vasai drown again? | नैसर्गिक नाले संकटात; वसई पुन्हा बुडणार ?

नैसर्गिक नाले संकटात; वसई पुन्हा बुडणार ?

Next

वसई : वसईत अनेक ठिकाणी सपाटीकरणाच्या नावाखाली बेकायदा माती भराव करून चक्क नैसर्गिक नालेच बुजविले जात असून पुन्हा दुसऱ्यांदा यंदाच्या पावसाळ्यात वसई सहित पापडी व कौल सिटी पाण्याखाली येणार असून शहरातील नागरिकांच्या असंख्य तक्र ारी असताना देखील वसई -विरार महापालिका व वसईचे महसूल खात्याने मात्र अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे.

वसईच्या पापडी रोड वर बिगबाजार मॉलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जमीनीवर केवळ सपाटीकरणाचा अर्ज दाखल करून केवळ अर्ज हीच परवानगी मानून अज्ञात इसमांनी लाखो ब्रास मातीभराव केला आहे, तर दुसरीकडे कौल सिटी मध्येही सांडोर -चुळणे हा भला मोठा नाला मातीभराव करून बुजवला आहे.

वसई पापडी व कौल सिटी मधील दोन्ही नाले हे नैसर्गिक असून राजकीय दबाव वापरून कोणीतरी अज्ञात इसमाने हे सांडोर ते उमेलमान आणि सांडोर ते चूळणे गाव जाणारे दोन्ही नैसर्गिक नालेच बुजवले असून याठिकाणी पाणी जाण्याचा मार्ग बंद केला आहे. दरम्यान, भाबोला- पापडी आणि कौल सिटीत भर रस्त्यावर दिवसाढवळ्या असे नाले बुजविणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. परंतु पालिकेच्या शहर अभियंता विभागाने आणि वसई तहसीलदार कार्यालयाने याची गंभीर दखल घेतलेली नाही.

एकूणच पालिकेच्या ‘आय’ व ‘एच’ प्रभागात सुरु असलेल्या या गंभीर बाबींचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा वसई- पापडी व चुळणेवासियांना येत्या पावसाळयात अनुभवायला मिळणार आहे. मुळातच नैसिर्गक नाले बुजवणे आणि वसईतील सपाटीकरण, मातीभराव थांबवले नाही.

अधिकाऱ्यांचा पवित्राही कोड्यात टाकणारा
माती भराव करुन नैसिर्गक नाले पूर्ववत करण्याचा गोरख धंदा सध्या वसईमध्ये सुरु असून याबाबत महसूल व महापालिका यांच्या कडे तक्र ार केल्यावर तलाठी, सर्कल आणि अभियंते यांनी आपले हात चक्क वर करून वरीष्ठांना विचारल्याशिवाय काहीही कारवाई करू शकत नाही असा पावित्रा घेतला आहे

आम्ही मंडळ अधिकारी माणिकपूर वसावे यांना नाले बुजवले असतील तर त्या घटनास्थळी पाठवले असून ते पाहणी करून अहवाल दिल्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू!
- किरण सुरवसे, तहसीलदार (वसई)
वसई - पापडी रस्त्यावर बिगबाजाराच्या बाजूला जमिनीवर मातीभराव झाला आहे. मात्र, जमीनमालकाने केवळ सपाटीकरणासाठी परवानगी मिळावी असा अर्ज तहसीलमध्ये केला असून त्याला अद्याप परवानगी दिलेली नाही.
दिनेश पाटील, तलाठी (सांडोर)
शहरातील नैसर्गिक नाले बुजवले जात असतील तर ते काम सध्या महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड पहात असून त्यांना याबाबत तशा सूचना देतो, त्यावर उचित कारवाई करू !
-माधव जवादे ,
शहर अभियंता, वसई विरार महापालिका

Web Title: Natural gutters in trouble; Vasai drown again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.