नगराध्यक्षांची नोटीस कारवाई फुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:49 AM2019-01-10T02:49:54+5:302019-01-10T02:50:12+5:30

मुख्याधिकारी ढिम्मच : तलासरीत रंगले नोटीस पे नोटीस चे नाट्य

The municipal corporation's notice foiled | नगराध्यक्षांची नोटीस कारवाई फुसकी

नगराध्यक्षांची नोटीस कारवाई फुसकी

googlenewsNext

तलासरी : इतके दिवस शहरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत कुंभकर्णी निद्रेत असलेल्या नगराध्यक्षा लोकमतमध्ये याबाबतचे वृत्त येताच खडबडून जाग्या झाल्या असून त्यांनी मोठ्या आवेशाने पूर्वीचेच फुसके नोटीस अस्त्र उगारले आहे. त्यामुळे या शहरातील दलाल आणि अवैध बांधकाम माफियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मुख्याधिकारी देखील अत्यंत बुळे असल्याने तेही अशा बांधकांमावर कोणतीच कारवाई करीत नाहीत. अध्यक्षांनी त्यांना नोटीसा काढा असे पत्र द्यायचे व त्यांनी ते बासनात गुंडाळून ठेवायचे. याच नाट्याचा प्रयोग आता पुन्हा एकदा रंगला आहे.
मंगळवारी नगर पंचायतीच्या सभेत यावर चर्चा होऊन या अनिधकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याची नेमणूक करण्याबाबत ठराव घेण्यात आला. नगर पंचायत अस्तित्वात येऊन अडीच वर्षे झाली, पण अजूनही ती बाळसे धरत नाही , ती मध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही त्याचाच फायदा अनधिकृत बांधकाम करणाºयांनी घेतला. इमारती उभ्या करून त्यातील गाळ्यांची लाखो रुपयांना विक्र ी करून दलाल मातब्बर झाले. या बांधकामाबाबत नगरसेवकांबरोबर नागरिकांनीही तक्र ारी केल्या पण सुस्त नगर पंचायत काही हलेना. फक्त कारवाईचा देखावा नोटीस पे नोटीस’ देऊन केला. याला दलालांनी भिक न घालता ते बांधकामाचे मजले चढवतच राहिले.

तलासरी नाक्यावर एन एन सन्स कंपाउंडमध्ये गाळे बनवून त्याची लाखोंच्या घरात विक्री करण्यात आली याची तक्रार नगर सेवक गणपत वाघलोडा यांनी केली पण कारवाई काय फक्त नोटीस. अभियंता नसल्याने तीन नगर पंचायतीचा कार्यभार सांभाळणारे मिश्रा हे आठवड्याला एक दोन दिवस येतात. त्यामुळे त्यांनाही नोटिसा व्यतिरिक्त काही काम करता येत नाही. नोटीसा काढून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तर मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी कारवाई करू असे गुळमुळीत उत्तर दिले. नगराध्यक्षानी यांनी मोबाईल उचललाच नाही.

जिल्हाधिकाºयांचा ‘वापर’
पालघर जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याचे सांगून नगर पंचायती ची परवानगी न घेता चालू असलेल्या बांधकामा वर नगर पंचायत कारवाई करीत नसल्याने जिल्हाधिकारी साहेबानी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे, तलासरी भागात बोगस एन.ए. आॅर्डरची प्रकरणे उघड होत आहेत.

Web Title: The municipal corporation's notice foiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.