कुडूसकरांची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

By admin | Published: April 16, 2017 04:21 AM2017-04-16T04:21:34+5:302017-04-16T04:21:34+5:30

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे.

Kuduskar's security is only for 6 police | कुडूसकरांची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

कुडूसकरांची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

Next

- वसंत भोईर,  वाडा

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे. मात्र, येथील तब्बल ५० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फक्त सहा पोलीस असल्याने कुडूसकरांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.
तालुक्यातील बराच मोठा भूभाग डि.प्लस झोन म्हणून जाहीर झाल्यापासून यथे कारखान्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली आहे. परिणामी येथे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे देशभरातून अनेक बेरोजगार येथे रोजच्या रोज येत आहेत. त्यामुळे २२ गावे, ४० पाडे याचा अतंर्भाव असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. त्यातच तालुक्यात कामानिमीत्त येणाऱ्यांच्या लोकसंख्येची नोंद नाही.
झापाट्याने विकसीत होणाऱ्या परिसरात काही वर्षात लोक संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्या प्रमाणात संबंधीत पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. कुडूससाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची अनेक वर्षाची मागणी आज पर्यंत पूर्ण झालेली नाही. कुडूस,चिंचघर, गुंज, उसर, मुसारणे, नारे, डाकिवली, चांबले, उचाट, डोंगस्ते, देवघर, बुधावली, काटी, कोंढले, म्हसवल, घोनसई मेट, वडवली, पैलंबार, सापरोंडे, मांगाठणे, वर्धा आदि ग्रामपंचायतींसह शेकडो कारखाने या पोलीस चौकीच्या कार्य क्षेत्रात येतात.
कुडूस हे गाव भिवंडी व वाडा या दोन शहराच्या मधोमध असून तब्बल ५० गावची मुख्य बाजार पेठ आहे. भिवंडी येथे कापड उद्योग मोठा आहे. त्या अनुशंगाने येथे रोजच कामगारांची मोठी ये-जा असते. त्यातून गुन्हेगारी वाढली आहे. चोऱ्या, पाकिट मारी, रात्री अपरात्री लुटण्याचे प्रकार येथे अधुन मधुन होत असतात.

लोकसंख्येच्या तुलनेत कुडूसमधील रहिवाशांसाठी सध्या असलेले पोलिस बळ अत्यल्प आहे. वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे पोलिस ठाणे निर्मीतीची गरज आहे.
- मेघना पाटील, सदस्य,
पंचायत समीती, वाडा

येथेनोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहेत. लोकांची संख्या वाढल्याने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढवणे आवश्यक आहे.
- जितेश पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमान संघटना

येथे अनेक नवखे लोक बाजारहाट करण्यासाठी येतात. त्यातच गुन्हेगारीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनची अत्यंत गरज आहे.
- अंजुमन सुसे, उपसरपंच, कुडूस

Web Title: Kuduskar's security is only for 6 police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.