'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 11:12 AM2024-05-01T11:12:08+5:302024-05-01T11:12:35+5:30

Prajwal Revanna case : प्रज्ज्वल रेवन्ना प्रकरणात AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

PM Modi was aware of Prajjavl Revanna Obscene Video Case case accusation of asaduddin Owaisi | 'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप

'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप

Prajwal Revanna Obscene Video Case : जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या अश्लिल व्हिडीओ प्रकरणामुळे देभरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्नाटक सरकारने त्यांच्या विरोधात एसआटीच्या माध्यमातून चौकशीचा फास आवळला आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर प्रज्ज्वल रेवन्ना हे देशातून फार झाल्याचे म्हटलं जात आहे. दुसरीकडे या प्रकरणावरुन विरोधकांनी त्यांचा सहयोगी पक्ष भाजपला घेरलं आहे.ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी थेट या प्रकरणात पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

प्रज्ज्वल रेवन्ना यांना अश्लिल व्हिडीओ प्रकरणात जेडीएस पक्षाने निलंबित केले आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास एसआयटी करत दुसरीकडे प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अशातच खासदार प्रज्वल रेवन्ना अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर जर्मनीला पळून गेल्याचा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेडीएस खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या ‘घाणेरड्या कृत्याबद्दल'माहिती होती. तरीही ते त्यांच्यासाठी प्रचार करायला गेले होते, असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

“त्याने (प्रज्वल) गरीब महिलांचे 2000 व्हिडिओ बनवले. मोदींनी तिकडे जाऊन त्यांच्यासाठी मते मागितली.महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा व्हिडिओ समोर आला तेव्हा तो (रेवन्ना) रातोरात जर्मनीला पळून गेला. मोदी महिला शक्ती बद्दल बोलतात आणि मुस्लिम महिलांचे भाऊ असल्याचा दावा करतात. पण आम्हाला असा भाऊ नको आहे. पंतप्रधान मोदी तुमच्याकडे गुप्तचर विभाग आहे. तुमच्याकडे रॉ आहे. तुमच्याकडे सर्व काही आहे. तुम्हाला माहीत आहे हा माणूस (प्रज्वल) कुप्रसिद्ध आहे. तो घाणेरडा आहे. तो माणूस म्हणवण्याच्याही लायकीचा नाही. तरीही तुम्ही त्याच्यासाठी मते मागायला गेलात, असं ओवेसी यांनी एका प्रचारसभेस बोलताना म्हटलं.

दरम्यान, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू असलेले प्रज्ज्वल रेवन्ना हे अश्लिल व्हिडीओ प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. प्रज्वल रेवन्ना यांच्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ असलेले हजारो पेन ड्राइव्ह हसन त्यांच्याच मतदारसंघात वाटण्यात आले आहेत. याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी नुकतीच त्यांनी मतं मागितली होती.कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेनड्राईव्हमध्ये काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंतचे तब्बल 2,976 व्हिडिओ आहेत. प्राथमिक तपासानुसार बहुतेक हे व्हिडिओ 2019 नंतर बंगळुरू आणि हसन येथील रेवन्ना यांच्या घरातील स्टोअररूममध्ये मोबाईल फोनवरून शूट केले गेले असावेत. पोलिसांनी काही पेन ड्राइव्ह याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

Web Title: PM Modi was aware of Prajjavl Revanna Obscene Video Case case accusation of asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.