ठेका हातून जाण्याच्या भितीने अपहरण; पालघरच्या अपहरणामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 11:47 PM2019-05-11T23:47:10+5:302019-05-11T23:47:51+5:30

कारखान्यात सुरू असलेले कामाचा ठेका आपल्या हातून जाण्याच्या भितीने दहशतीचा वापर करून कंपनीतील देखरेख करणाऱ्या व्यक्तीलाचा उचलून नेल्याची माहिती अपहरण झालेल्या आरिफ याचे भाऊ मोहम्मद आसिफ अली यांनी लोकमतला दिली

 Kidnapping of contract to be abusive; The reasons behind the abduction of Palghar | ठेका हातून जाण्याच्या भितीने अपहरण; पालघरच्या अपहरणामागचे कारण

ठेका हातून जाण्याच्या भितीने अपहरण; पालघरच्या अपहरणामागचे कारण

Next

पालघर : कारखान्यात सुरू असलेले कामाचा ठेका आपल्या हातून जाण्याच्या भितीने दहशतीचा वापर करून कंपनीतील देखरेख करणाऱ्या व्यक्तीलाचा उचलून नेल्याची माहिती अपहरण झालेल्या आरिफ याचे भाऊ मोहम्मद आसिफ अली यांनी लोकमतला दिली. ही अपहरण करण्याची घटना पालघरच्या औद्योगिक परिसरात गुरूवारी दुपारी घडली आहे.
सातपाटी-पालघर जुन्या रस्त्यावरून आपल्या कंपनीत जाणाºया आरिफ मोहम्मद अली या कंपनी मालकांच्या अपहरणाबाबत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहरण करण्यात आलेले आरिफ यांचा स्वत:चा एक कारखाना पालघर पश्चिमेला आहे. त्याच पुढे असलेलेल्या कॉनवरा इंडस्ट्रीज या कंपनीचे लायजनिंगचे कामही याच्याच कडे होते. त्यामुळे त्यांच्या देखरेखीत सर्व काम सुरू होते. त्याच कंपनीत प्रशांत संखे या तरूणाचेही स्पेअर पार्ट पुरविण्याचा ठेका होता. ठेक्या बाबत गेले अनेक दिवस हमरीतुमरी सुरू होती.
हातातील काम आरिफ अली यांच्यामुळे निसटत की काय ही भावना बळावल्याने प्रशांत संखे आणि इतर तीन यांनी कट रचून आरिफ अली हे अजय म्हस्के या कामगारासोबत रिक्षाने कंपनीकडे जात असतांना एका पिकअप गाडीने त्यांची रिक्षा अडवली. त्याचवेळी मागून आलेल्या स्कॉओेर्पिओ गाडीत त्यांना बळजबरीने कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अपहरणकर्त्याचा तपास करण्याचे पोलीस अधिकक्ष गौरव सिंह यांनी आदेश दिले आहेत. या अपहरणाच्या थराराने पालघरसह जिल्हयातील कारखानदारांवर दहशतीचे सावट पसरले आहे. तपास पथकाने बोईसर येथून अपहरण ज्या स्कॉर्पिओने केले होते. ती गाडी ताब्यात घेतली आहे. गुरूवारपासून अपहरणकर्ते आणि अपहरत आरीफ अली यांचा शोध पोलीस घेत आहेत. तपास पथकाने डहाणू बोर्डी पर्यंत त्यांचा माग काढला आहे. संशयीत गाडीचा चारोटी येथील टोल प्लाझा वरून सी.सी. टीव्ही फुटेज तपासण्यात आली आहेत.

प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन रडारवर
या अपहरणप्रकरणी संशयी म्हणून पालघरमधील प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन अशा तीन व्यक्तीची नावे समोर आली असून त्यांचे शेवटचे लोकेशन डहाणू भागात असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र चोहोबाजूंनी फिरवल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत अपहरणकर्ते आरिफ यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या घरात चिंताग्रस्त वातावरण बनले आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलीस घेतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दहशतीचा वापर करून कपंनी मालकाचे अपहरण होत असेल तर संरक्षणा अभावी कंपनी बंद करावी लागेल. पोलिसांनी आरिफ यांचा शोध घेऊन गुंडाना ताब्यात घ्यावे.
- रायचंद शहा, अध्यक्ष,
पालघर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन लि. पालघर

अपहरण कर्त्यांच्या हातुन माझ्या पतीची सुखरुप सुटका करण्याची सर्वस्वी जबाबदारी पालघर पोलीसांची असून पोलीस अधिक्षकांनी यात जातीने लक्ष घातले पाहिजे.
-शाहिस्ता अली, (आरिफ यांची पत्नी)

Web Title:  Kidnapping of contract to be abusive; The reasons behind the abduction of Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.