पालकमंत्र्यांच्या दणक्याने खोडाळा वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:23 AM2019-07-18T00:23:57+5:302019-07-18T00:24:08+5:30

सतत वीज जाणे किरकोळ कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत होणे वीज बिल भरण्यासाठी २०/३० किमीची पायपीट या सगळ्या अडचणी लक्षात घेवून खोडाळासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र व्हावे, अशी मागणीजोर धरत होती.

Keeping the path of Khulna power sub-station open with the help of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या दणक्याने खोडाळा वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा

पालकमंत्र्यांच्या दणक्याने खोडाळा वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा

Next

मोखाडा : सतत वीज जाणे किरकोळ कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत होणे वीज बिल भरण्यासाठी २०/३० किमीची पायपीट या सगळ्या अडचणी लक्षात घेवून खोडाळासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र व्हावे, अशी मागणीजोर धरत होती. तशी मंजुरीही मिळाली. मात्र तरीही कासवगतीने ही प्रक्रि या सुरू होती. ही बाब भाजपचे उपाध्यक्ष संतोष चोथे यांनी नवनियुक्त पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चव्हाण यांनी तत्काळ तहसीलदारांना आदेश देवून अवघ्या तासाभराच्या आत सातबारा उपलब्ध करुन दिला. ही जागाही महावितरणाच्या नावावर झाली असून वनविभागालाही आडकाठी न आणण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आता या केंद्राच्या कायदेशीर अडचणी सुटल्या असून पहिल्याच दणक्यात पालकमत्र्यांनी ही अडचण सोडवल्याने तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मोखाडा तालुक्यात मोखाडा आणि खोडाळा असे प्रशासकीय दोन विभाग आहेत मोखाडा मुख्यालयापासून तब्बल २० कि.मी.हून अधिक अंतर कापून खोडाळा येथे जावे लागते अशी स्थिती आहे. यामुळे तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागाचा उपविभाग खोडाळा येथे आहे. मात्र महत्त्वाचा असलेल्या महावितरणचे या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नव्हते. यामुळे मोखाड्याहून खोडाळा शहर आणि त्यापलीकडे तब्बल १०/१३ कि.मी.पर्यंतच्या गावपाड्यांना ही वीज पुरवली जात होती. यामुळे जुन्या तारा वाकलेले पोल कमी दाबाची वीज अशा असंख्य अडचणीने खोडाळाकर हैराण होते. याबाबत खोडाळ्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र द्यावे, अशी मागणी होती. हे केद्र मंजुरही झाले होते. मात्र कायदेशीर कचाट्यात ते अडकलेले असल्याने होवू शकलेले नव्हते.
>पालकमंत्री असावा तर असा, जनतेकडून चव्हाणांचे कौतुक
याबाबत मोखाडा या ठिकाणी पालकमंत्री चव्हाण यांनी तातडीने पाउले उचलून सातबारा आणि बाकी परवानग्या अशा किरकोळ कामांना एवढा उशीर लागतोच कसा? या भाषेत खडसावले तर कागदोपत्री कार्यवाही करत बसा मात्र ते काम आत्ताच्या आता सुरू करा तशा सूचना ठेकेदाराला द्या, असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांच्या या दणक्याने महिनोन्महिने रखडलेले काम त्याच दिवशी तासाभरात झाल्याने पालकमंत्री असावा तर असा अशी चर्चा तालुक्यात रंगली होती. यामुळे आता लवकरच खोडाळावासीयांचा वीजेचा प्रश्न सुटणार आहे.

Web Title: Keeping the path of Khulna power sub-station open with the help of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.