दागिने चोरणारे दोघे गजाआड

By admin | Published: January 14, 2017 06:00 AM2017-01-14T06:00:12+5:302017-01-14T06:00:12+5:30

भिवंडी-कल्याण मार्गावर कल्याणच्या दिशेने रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातातील दागिने भरलेली बॅग हिसकावून

Jewelry thieves are both gone and gone | दागिने चोरणारे दोघे गजाआड

दागिने चोरणारे दोघे गजाआड

Next

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावर कल्याणच्या दिशेने रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातातील दागिने भरलेली बॅग हिसकावून पळालेल्या दुुचाकीवरील दुकलीला कोनगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले.
गिरगावात राहणाऱ्या प्रीती गुप्ता आपल्या पती व सासऱ्यासह नातेवाइकांकडे आल्या होत्या. त्या घरी जाण्यासाठी कल्याणमार्गे रिक्षाने जात होत्या.
आपले सोन्याचे दागिने आपल्या बॅगेत ठेवले होते. सरवली-गोवा येथील टोलनाक्याजवळ असलेल्या गतिरोधकामुळे रिक्षाचा वेग कमी झाला. त्यादरम्यान पाठीमागून पाठलाग करणाऱ्या दुचाकीवरील दुकलीने हातातील बॅग हिसकावून पोबारा केला. या झटापटीत प्रीती रिक्षातून खाली पडल्याने डोक्याला व पाठीला दुखापत झाली. पोलिसांनी तारिक सय्यद (३५) व अरमान कुरेशी (४१) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ लाख ७१ हजारांचे २९ तोळे दागिने व मोबाइल जप्त केला. (प्रतिनीधी)

Web Title: Jewelry thieves are both gone and gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.