आणखी एक सेक्शन कार्यालय वाढवा, विक्रमगडकरांची मागणी, वीजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:34 AM2017-11-29T06:34:02+5:302017-11-29T06:34:23+5:30

विक्रमगड तालुक्याची निर्मिती होऊन आज १७ वर्षाचाकाळ लोटला हा तालुका ग्रामीण आदिवासी तालुका असून या तालुक्याचा विस्तार पाहाता येथे वीजमंडळाचे आणखी एक कार्यालय कार्यान्वीत होण्याची आवश्यकता आहे.

 Increase one more section office, demand for Vikramgadkar, anger among the citizens due to the power crisis persists | आणखी एक सेक्शन कार्यालय वाढवा, विक्रमगडकरांची मागणी, वीजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप  

आणखी एक सेक्शन कार्यालय वाढवा, विक्रमगडकरांची मागणी, वीजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप  

Next

विक्रमगड : तालुक्याची निर्मिती होऊन आज १७ वर्षाचाकाळ लोटला हा तालुका ग्रामीण आदिवासी तालुका असून या तालुक्याचा विस्तार पाहाता येथे वीजमंडळाचे आणखी एक कार्यालय कार्यान्वीत होण्याची आवश्यकता आहे. जे कार्यालय अस्तित्वात आहे त्यामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विजेची सेवा वरचेवर खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
आज विक्रमगडमध्ये मोठया प्रमाणावर वीजग्राहकांची संख्या असून ती वाढती आहे़ या तुलनेत इतर तालुक्यात तीन तीन सेक्शन कार्यालय आहेत मात्र, विक्रमगडमध्ये अवघे एक कार्यालय असून त्यातही अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीज समस्या कायम आहे़ त्यातच विजेच्या चोरीचे प्रमाणही वाढलेले असल्याने १०० टक्के मध्ये ७० टक्के विजेचा लॉस महावितरण कंपनीला सोसावा लागत आहेत़
विक्रमगड तालुका भौगोलिक दृष्ट्या चारी बाजुंनी ६़ कि़ मी़ क्षेत्रफळ पसरलेले आहे़ त्यांस एकुण १४० कि़ मी़ ची उच्चदाबाची विद्युत वाहीनी व लघु दाब असलेल्या ४४० की़मी ची वाहीनी आहे़ तालुक्यांत १ एकच शाखा कार्यालय असल्यामुळे लाईन ब्रेक डाउन होणे, नवीन सर्विस कनेक्शन, ना-दुरुस्त मीटर बदलणे, मेन्टनेन्स, वीजचोरीस आळा घालणे सध्या असणाºया कर्मचाºयांना जिकिरीचे बनले आहे.
त्यामुळे या तालुक्यासाठी किमान आणखी एक सेक्शन कार्यालयाची गरज आहे़ तुर्तास जे कार्यालय कार्यान्वीत आहे तेही कर्मचारी संख्या अपुरी व अपºया जागेत आहे़ या कार्यालयात एकूण ११ कर्मचारी असून पैकी ५ ते ६ कर्मचारी हे नियमित आहेत़ उर्वरीत हे सतत गैरहजर, अगर आजारपण व वयोवृध्द झाल्याने ते पुर्वी प्रमाणे काम करण्यास सक्षम नाही़ असे चित्र आहे.
एकंदरीत या स्थितीमुळे सर्व तालुक्यांचा विजेच्या कामाचा बोजा हा ५/६ कर्मचारी वर्गावरच पडत असल्याने तक्रारीमध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे ग्राहकांना चांगली सेवा पुरविण्या सध्याची व्यवस्था अपूरी असल्याचे वारंवार जाणवते.
दरम्यान, तालुक्यातीत ९ हजारापेक्षा अधिक वीज ग्राहक अधिकृत आहेत़ तर अनेकांच्या घरी मीटर बसविलेले असतांनाही त्यांना बिल अदा केले जात नाही. तसेच ज्यांना वीजबिल अदा केले जाते त्यांना युनिटपेक्षा जास्त वापराचे भरमसाठ आकड्यांचे वीजबील दिले जाते. तसेच मोठयाप्रमाणे तालुक्यात वीज चोरी होत असतांना त्यावर आळा घालण्यात महावितरण कमी पडत आहे. वीजचोरी पकडण्याची मोहिम राबविल्यास व प्रत्येकाला मीटर सक्तीचे केल्यास महावितरणाचे नुकसान कमी होण्यास मदत होईल असे चित्र आहे. त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेचा शुभारंभ करुन जास्तीत जास्त नवे मीटर अल्प दरात व सवलतीच्या दरात खेडयापाड्यातील लोकांना देण्याची मोहिम होती घेतली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी सांगीतले. या बैठकीस नरगराध्यक्ष रविंद्र खुताडे, नगरसेवक महेश पाटील, तुशार सांबरे आदींनी समस्या मांडल्या.

प्रस्ताव उर्जामंत्र्याकडे
विक्रमगडसाठी आणखी एका शाखा कार्यालयाची आवश्यकता असून तसा प्रस्ताव तयार करुन मंजूरी करीता उर्जामंत्री महाराष्टÑ् शासन यांचकडे सादर करण्यात आला आहे. तसेच या संदर्भामध्ये पाठपुरावा केला जात असल्या माहिती येथील महावितरण कार्यालयाचय अधिकाºयांनी दिली.

Web Title:  Increase one more section office, demand for Vikramgadkar, anger among the citizens due to the power crisis persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.